याकूब मेमन याची कबर फुलांनी सजवण्यात आल्याचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल झाला. यावरून मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पेंग्विन सेनेने कबर बचाव अभियान सुरु करावं. शिवसेना दाऊदचा प्रचारक म्हणून काम करते असा खोचक टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.
आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघडी यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, याकूब मेमनच्या फाशीला विरोध करणारे अस्लम शेख मुंबईचे पालकमंत्री होती. सत्तेत असणारा शिवसेना पक्ष हा दाऊदचे समर्थक होते हे आम्ही पाहिलंय. शिवसेना आता दाऊदचे प्रचारक झाले आहेत. ज्या दाऊदने पाकिस्तानच्या मदतीने देशात, महाराष्ट्रात, मुंबईत बाँम्ब स्फोट करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. त्याचा प्रमुख साक्षीदार, १९९३ च्या मुंबई बाँम्ब स्फोटातील प्रमुख आरोपी याकूब मेमनच्या कबरीवर सुशोभिकरणासाठी परवानगी उद्धव ठाकरे यांनी कशी दिली? असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. मैदानै, उद्याने, स्मशानभूमी यांचे सुशोभिकरण तसेच देखभाल, दुरुस्ती याची संपूर्ण जबाबदारी मुंबई पालिकेची असते. महापौर तुमचा होता, मुख्यमंत्री तुम्ही होता आणि दाऊदचे प्रचारक म्हणून काम केलं, असे आशिष शेलार म्हणाले.
आता पेंग्विन सेनेच्या युवा अध्यक्षांनी कबर बचाव अभियान सुरु करावं. माझी खुर्ची, माझा परिवार यापलीकडे पेंग्विन सेनेला अस्तित्व नाही. पेंग्विन सेना वानखेडे उखडून टाकायला गेले होते. मग आता याकूब मेमनची कबर उखडून दाखवा, असे आव्हानच आशिष शेलार यांनी दिले आहे. याकूबला जिवंत ठेवला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका होती, असंही आशिष शेलार यांनी सांगतील आहे.
हे ही वाचा:
“पितृपक्षात बाळासाहेब खाली येतील आणि आम्ही धनुष्यबाण जिंकू”
निष्पाप बळी घेणाऱ्या याकुब मेमनच्या कबरीला संगमरवरी फरशी
अमरावतीमधील ‘त्या’ मुलीचा लागला शोध
दरम्यान, दसरा मेळव्याबाबत आशिष शेलार म्हणाले, एका सामान्य शिवसैनिकला आता मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे पेंग्विन सेनेची कोल्हेकुही सुरू आहे. मात्र जो वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मांडेल तोच दसरा मेळावा घेईल.शिवाजी पार्कचे मैदान कुणाला द्यावे याबाबत नियम नियमावली आहे त्यानुसार संबंधित यंत्रणा निर्णय घेतील.