भारतीय जनता पार्टीचे नेते आशिष शेलार यांनी पुन्हा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेने भाजपाच्या नावावर मतं मिळवली. शिवसेना फक्त आयत्या बिळावर नागोबा आहे. तर संजय राऊत हे फक्त बेडूक उडया मारण्याचे काम करत आहेत, अशी टीका शेलार यांनी केला आहे.
बेडूक उड्या मारणारे संजय राऊत हे शिवसेनेचे नवे नेतृत्व करत आहेत. जिथे तिथे राऊत मुख्यमंत्रांचे वकीलपत्र घेऊन बोलत आहेत. राऊत हे अनुशासन पाळत नाहीत. राऊतांचा लेख म्हणजे आंब्याच्या झाडाला, काकडी किती लागल्यात मोजण्यासारखे असल्याचा घणाघात शेलारांनी केला आहे.
बाबरी मशीद पडली होती तेव्हा शिवसेना कुठे होता? असा सवाल शेलारांनी केला आहे. पुढे ते म्हणाले, शिवसेना बाबरी मशिदीत अदखलपत्र मागत आहे. शिवसेनाचा प्रत्येक कार्यक्रम म्हणजे आयत्या बिळावर नागोबा आहे. शिवसेनेला फाटक बनियान म्हणायच का? असा सवाल करत शिवसेनवर त्यांनी टीका केली आहे.
हे ही वाचा:
जोधपूरमध्ये झेंड्यावरून दोन गटांत राडा
‘अॅमेझॉन’वर गुन्हा; औषधांची प्रिस्क्रिप्शनविना विक्री
राणा दांपत्याच्या घरात पालिकेला दिसले ‘अनधिकृत’
शिवसेनेला राज्यात अशांतता करायची आहे. या महाविकास आघाडीचे सरकार राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या रिमोट चालत असल्याचा गंभीर आरोप शेलार यांनी केला आहे. त्यामुळे हे सरकार रिमोट कंट्रोलवर चालणारे सरकार बोलायला काहीच हरकत नाही. या सरकारच्या काळात राज्यात वैचारिक स्वातंत्र्य राहिलेले नाही. शिवसेना विरोधकांवर दमन चक्र करण्याचे काम करत असले तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिला आहे.