‘भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच म्हणायचे आमचा गड’

आशिष शेलारांचा शिवसेना आणि आदित्य ठाकरेंवर हल्लबोल

‘भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच म्हणायचे आमचा गड’

भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी वरळीत भव्य दहीहंडीचे आयोजन केले आहे. यावेळी आशिष शेलार यांनी पुन्हा युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच आमचा गड…आमचा गड म्हणून मिरवायचे, असा टोला आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.

शुक्रवार, १९ ऑगस्टला देशभरात दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. यावेळी आशिष शेलार यांनी वरळीमध्ये भव्य दहीहंडीचे आयोजन केले आहे. त्यानंतर वरळी हा आमचा गड आहे, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यावर आशिष शेलार यांनी ट्विटरद्वारे आदित्य आणि शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे. भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांचे थर कोसळायला लागलेत. भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच आमचा गड..आमचा गड म्हणून मिरवायचे.

मुंबईकरच वरळीतून कोसळणाऱ्या थरांचा थरार निवडणूकीत “करुन दाखवतील” आमचं ठरलंय!!’ असा खोचक टोला आशिष शेलार यांनी शिवसेनला लगावला आहे. शिवसेनेचे आमदार सचिन अहिर हे दरवर्षी वरळीच्या जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करतात. मात्र यावेळी भाजपाने सर्वात आधी जांबोरी मैदान पटकावले असून, सचिन अहिर यांचा हिरमोड झाला आहे.

हे ही वाचा:

संजय राऊत यांच्या दोन गाड्या कुणाच्या?

‘मी ख्रिश्चन आहे, मी तिरंग्याला सलाम करणार नाही’

रश्दी यांच्यानंतर तस्लिमा नसरीन यांनी व्यक्त केली ही भीती

काबूल मशिदीत बॉम्बस्फोट २१ ठार, अनेकजण जखमी

बुधवारी सुद्धा आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला होता. ते म्हणाले होते, मुळातच गड कुणाचा आणि कुणी ठरवला? गडावर ठरवणं हे फक्त शेलारमामाच करू शकतात. त्यामुळे गड वगैरे आम्ही मानत नाही. स्वत: आदित्य ठाकरे हेदेखील भाजपाच्या मतांवर निवडून आले आहेत. युतीमध्ये ते जिंकून आले आहेत”, असं आशिष शेलार म्हणाले होते.

Exit mobile version