शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त २३ जानेवारी रोजी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर आशिष शेलार यांनी खिल्ली उडवली आहे. काल उद्धव ठाकरे यांनी केलेलं भाषण म्हणजे भागम भाग याचा तिसरा भाग आहे, असं ट्विट सुद्धा त्यांनी केले आहे.
भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबई महापालिकेला लुटणारे दरोडेखोर हे ठाकरे गटाचे पदाधिकारी असल्याचा आरोप मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी आज केला आहे.
कल का उद्धव जी का भाषण यह भागम भाग का पार्ट-३ है। भाजपा के पारदर्शक चौकीदारी की वजह से ही मुंबई पालिका के डिपॉजिट सुरक्षित हैं। २५ सालों से सिर्फ और सिर्फ ठेकेदारों का भला चाहना यही उद्धव जी के शिवसेना की भूमिका रही है।@mybmc @BJP4Mumbai @BJP4Maharashtra pic.twitter.com/3vajkpymyv
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 24, 2023
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त २३ जानेवारी रोजी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली उडवताना आशिष शेलार म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या बैठकीत केलेले भाषण हे नाचगाणे होते. मुंबई महापालिकेच्या ठेवी सुरक्षित असण्याचे कारण म्हणजे भाजपने पारदर्शक पद्धतीने देखरेख केली आणि म्हणूनच त्यामुळे त्यांना ती लुटता आली नाही.
मुंबई महापालिकेला लुटणारे उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे अधिकारी
उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे गेल्या २५ वर्षात मूल्यमापन केले तर मुंबई महापालिकेला लुटणारे दरोडेखोर हे उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे अधिकारी आहेत. उद्धव ठाकरे हे अयशस्वी नेते असल्याचे सांगून शेलार पुढे म्हणाले की, ते सेठजी आहेत, जे फक्त बिल्डर आणि कंत्राटदारांची वकिली करतात. उद्धव ठाकरेंच्या पक्षाची वैचारिक मनमानी इतिहासात नोंदवली जाईल. उद्धव ठाकरे हे अपयशी नेते आहेत. ते आपल्या कुटुंबातील चुलत भावांना एकत्र ठेवू शकत नव्हते. केवळ कौटुंबिक पातळीवर ते अपयशी ठरले नाहीत, तर ते आपल्या पक्षाच्या लोकांनाही एकत्र ठेवू शकले नाहीत. गणेश नाईकांपासून नारायण राणेंपर्यंत सर्वजण त्यांच्यावर आरोप करत बाहेर पडले.आहेत यातून काय ते सिद्धच होते.
हे ही वाचा:
टाटा एआयजीच्या व्यासपीठावर कारुळकर प्रतिष्ठानचे सांकेतिक भाषा सत्र
कुस्ती अध्यक्ष बृजभूषण प्रकरणाच्या चौकशी समितीची अध्यक्ष मेरी कोम
ठाकरेंची शिवसेना पहिल्या क्रमांकापासून ‘वंचित’
‘जन गण मन’ : राष्ट्रगीत एक अभिमान गीत
राऊत यांच्यावरही टीका
शेलार म्हणाले की, दावोसमध्ये झालेल्या कराराची आकडेवारी ऐकून संजय राऊत संतापले आहेत. संजय राऊत यांना इंग्रजी येते का? ठाकरे यांनी शिवसेना आणि वंचित बहुजन विकास आघाडी यांच्याशी केलेल्या युतीचा खरपूस समाचार घेत शेलार म्हणाले की, भाजपच्या भीतीपोटी दोघांनीही युती केली आहे. विधानभवनात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरण कार्यक्रम अराजकीय असूनसुद्धा उद्धव ठाकरे सहभागी झाले नाहीत.