भाजपा नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. राज्यपालांनी १२ आमदारांच्या नियुक्त्या रखडवल्याच्या आरोपावर आशिष शेलार यांनी भाष्य केलं. कोरोनाच्या काळात १२ आमदारांचा विषय कुठून आला? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही निवडणुकीचं काम केलं तर त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार जबाबदार. आज कोरोनाच्या काळात आणि बालकांच्याही चिंतेच्या काळात यांना १२ आमदारांची आठवण कशी येते? स्वतःचं राजकारण सुरू आहे, अशी टीका शेलारांनी केली.
महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून काय भाषा वापरली जात आहे? रोज १२ , १२ ची टिमकी काय लावली आहे? तुमचे १२ वाजले आहेत काय? अशी प्रश्नांची सरबत्ती शेलारांनी केली.
भुताने जर फाईल पळवली असेल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, भाजपा तर काही करत नाही, पण भाजपाने एक डाव भुताचा टाकला तर तुम्हाला भारी पडेल हे सुद्धा संजय राऊत यांनी लक्षात ठेवावे, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला.
हे ही वाचा:
शरद पवारांचा नातू म्हणून दुसरा न्याय का?
मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास गंभीर परिणाम
मुख्यमंत्र्यांचे ज्ञान, अज्ञान की वाफा?
लसीकरण झालेल्यांना लोकलने प्रवास करायला द्या
गेल्यावर्षी ६ नोव्हेंबरला महाविकास आघाडीतील नवाब मलिक, अमित देशमुख आणि अनिल परब या तीन मंत्र्यांनी राजभवनात जाऊन ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली होती. मात्र, तेव्हापासून राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीबाबत वक्तव्य केलेले नाही. या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल सचिवालयाकडे १२ आमदारांच्या नावाचा यादी मागितली होती. मात्र, सचिवालयाने अशी यादी उपलब्ध नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे यावरुन राजकारण सुरु झाले होते.