भारतीय जनता पक्षाची ठरवलेली आणि अपेक्षित नेत्यांची कोअर कमिटीची बैठक आज सुरू आहे. भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडत आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्व कोअर कमिटीचे सदस्य आज राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर आणि संघटनेच्या अति महत्त्वाच्या बाबींवर आज चर्चा करणार आहेत. भाजपा नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भातील माहिती दिली. तर याचवेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवरही निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकार म्हणजे भ्रष्टाचाराचा महामेरू आहे असे शेलार यांनी सांगितले.
भाजपा कोअर कमिटीची ही बैठक जवळपास संपूर्ण दिवस चालणार असून भाजपा नेते महाराष्ट्रात समोर आ वासून उभ्या असलेल्या गंभीर प्रश्नांवर चर्चा करतील. सामान्य जनता जी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होरपळून निघाली आहे. त्यांचे आयुष्य पुन्हा एकदा सुरळीत आयुष्य सुरू करावं या दृष्टीने भाजपा प्रयत्नशील असेल. तर राज्यातील तमाम सामाजिक घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपा कार्यक्रम आखणार असल्याचेही शेलार यांनी सांगितले.
हे ही वाचा:
श्रीलंकेच्या भारतीय राजदूतांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट
‘यशवंत जाधवांवर झालेल्या कारवाईचे स्पष्टीकरण पक्षप्रमुखांनी द्यावे’
नवाब मलिकांचा मुलगा फराझला लवकरच ईडीकडून समन्स
महाराष्ट्र भाजपाच्या कोअर कमिटीची मुंबईत खलबतं! कसली व्यूहरचना ठरणार?
यावेळी बोलताना आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवाही तोफ डागली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे एकच काम करते ते म्हणजे भ्रष्टाचार, गुन्हेगारी आतंकवाद यांच्या समर्थनार्थ पूर्णवेळ काम करणे आणि या सरकारचे एका शब्दात वर्णन करायचे झाले तर ते भ्रष्टाचाराचा महामेरू अशा स्वरूपाचेच करावे लागेल इतकी परिस्थिती महाराष्ट्रात सरकारची आहे असे ते म्हणाले. तर त्यांनतर त्यांनी एका काव्यातून सरकारवर निशाणा साधला
भ्रष्ट व्यवस्था का किला ध्वस्त हो,
नैतिकता का पाठ प्रशस्त हो,
दुर्जन को शासन का भय हो,
सज्जन का जीवन निर्भय हो
व्यक्ती व्यक्ती कहे गर्व से
मुझ में मेरा धर्म बचा है
या साठी भाजपा आगामी काळात काम करणार असून राज्यातील सामान्य जनतेला न्याय मिळवून देईल अशी ग्वाही आशिष शेलार यांनी दिली आहे. तर भ्रष्टाचार, आतंकवाद यांच्या विरुद्धच्या लढाईला सुरुवात झाली असून सामान्य जनतेच्या मनातील रामराज्य येण्याची मुहूर्तमेढ रोवली गेल्ये असे यावेळी शेलार यांनी सांगितले.