26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणआशीष शेलार संतापले; फेकलेल्या तुकड्यावर त्यांचे घर चालते

आशीष शेलार संतापले; फेकलेल्या तुकड्यावर त्यांचे घर चालते

संजय राऊत यांच्यावर प्रखर टीका

Google News Follow

Related

शिवसेना आणि चिन्ह मिळवण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा सौदा झाला असल्याचं विधान खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यांच्या या विधानावरून सगळीकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राऊत यांची औकातच काढली आहे.

संजय राऊत यांनी त्यांच्या औकातीत राहावे. औकातीपेक्षा जास्त बोलण्याची गरज नाही. त्यांनी कधीही निवडणूक लढवली ना त्यांनी निवडणूक कधी जिंकली. कुणाच्या तरी फेकलेल्या तुकड्यावर त्यांचे घर चालत आहे. त्यामुळे बोलताना जरा विचार करून बोलावे अशी जोरदार हल्ला भाजपचे नेते आशिष शेलार चढवला आहे. ज्या संजय राऊत यांनी एकही कधी निवडणूक लढवली नाही. ते आता भाजपवर आणि शिंदे गटावर टीका करत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांना सत्ता सोडावी लागली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्री पदासाठी आणि सत्तेसाठी त्यांनी हिंदुत्व सोडले होते अशी जळजळीत टीका शेलार यांनी केली आहे.

आम्ही कालपर्यंत सोबत होतो, तर चांगले मात्र आज अचानक एवढे वाईट झालो का? असा सवाल करत नाशिकचे पालक मंत्री दादा भुसे यांनीही जळजळीत टीका केली आहे. हे वाईट आहे, मला अशा लोकांची कीव येते. कालपर्यंत सोबत सहकाऱ्यांबद्दल कुणी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन कशी टीका करू शकतं असा प्रश्न दादा भुसे यांनी उपस्थित केला.

हे ही वाचा:

हिंदुत्वाची विचारसरणी हि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पायदळी नेऊन ठेवली होती

तेल गेले .. तूपही जाणार ? मशाल चिन्हही गोत्यात

सूत्रधार समोर आला, सोरोस यांचा पपलू कोण?

महाशिवरात्री विशेष : का आवडतात ‘महादेवांना’ बेलपत्र?

चांडाळ-चौकडीने शिवसेनेचा घात केला

अशा पद्धतीने टीका करणे चुकीचे असून आम्हीही बोलू शकतो, शिवसैनिक बोलू शकतो. घरात बसून शिवसेना वाढलेली नाही. यासाठी अनेक शिवसैनिकांनी रक्त सांडलं आहे. अनेकांनी जीवाच रान केलं आहे. खरं म्हणजे याच चांडाळ-चौकडीने शिवसेनेचा घात केला, असा जोरदार प्रहार दादा भुसे यांनी केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा