लखीमपूर प्रकरणातील दुसऱ्या एफआयआरमध्ये आशिष मिश्रा यांचे नाव नाही

लखीमपूर प्रकरणातील दुसऱ्या एफआयआरमध्ये आशिष मिश्रा यांचे नाव नाही

लखीमपूर खिरीमध्ये चार शेतकरी संघटनेच्या लोकांना कारने चिरडून ठार मारले, परिणामी युनियनच्या लोकांनी एका चालकासह तीन भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करून ठार केले. या घटनेत एका पत्रकारालाही आपला जीव गमवावा लागला आहे. या हिंसाचाराप्रकरणी दाखल झालेल्या दुसऱ्या प्राथमिक माहिती अहवालात (एफआयआर) आंदोलकांमधील काही समाजकंटकांनी गाडीतून जाणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचे म्हटले आहे. गाडी अंगावर घातली गेल्याचा किंवा गाडीमध्ये केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा असल्याचा कोणताही उल्लेख दुसऱ्या एफआयआरमध्ये करण्यात आलेला नाही.

हिंसाचाराच्या पहिल्या एफआयआरमध्ये केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्या नावाचा उल्लेख आहे. मात्र, दुसऱ्या एफआयआरमध्ये एका अज्ञात हल्लेखोराचा उल्लेख करण्यात आला आहे. या हिंसाचारानंतर राजकीय नाट्य रंगल्याचे चित्र होते. काँग्रेसने या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. हिंसाचारात मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांची भेट घेण्यासाठी प्रियांका गांधी यांनी लखीमपूरमध्ये धाव घेतली होती. मात्र त्यांना आधी नजर कैदेत ठेऊन मग अटक करण्यात आली होती.

हे ही वाचा:

रेल्वेची ‘पिकदानी पाकिटे’ संकल्पना काय आहे? वाचा सविस्तर

धमकावणाऱ्या शिवसैनिकांना रोखण्यासाठी कांदिवलीत भाजपा उतरली रस्त्यावर

अनिल देशमुखांच्या मुलाला होणार अटक?

सक्तीने बंद करण्यासाठी ठाणे उपमहापौरांचे पती पवन कदम यांनी केली रिक्षाचालकांना मारहाण

त्यानंतर केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा एसआयटीसमोर चौकशीसाठी हजर होते. चौकशी दरम्यान मिश्रा यांनी सहकार्य न केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. दुसऱ्या एफआयआरमध्ये एका अज्ञात हल्लेखोराचा उल्लेख असून त्यामध्ये आशिष मिश्रा यांचा उल्लेख नाही.

Exit mobile version