आमदार आशिष जैस्वाल यांचा गंभीर आरोप
महाविकास आघाडी सरकारमध्ये निधीवाटपावरून असलेले वाद यापूर्वी अनेकदा चव्हाट्यावर आलेले आहेत. आमदार आशिष जैस्वाल यांनी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे. तसेच यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच यावर योग्य कृती होत नाही तोपर्यंत नाराजी दूर होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार आशिष जैस्वाल यांनी काही मंत्री टक्केवारी मागत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याविषयी योग्य कारवाई होत नाही तोपर्यंत नाराजी दूर होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. निधीवाटपावरून नाराजी कायम आहे. आम्हाला न्याय मिळाला किंवा नाही मिळाला हा विषय नसून मतदारसंघाला न्याय मिळायला हवा, असे आशिष जैस्वाल म्हणाले.
आमदार आहेत म्हणून सरकार आहे. आमदार सरकारच्या विरोधात जाऊ शकतात, असा इशार त्यांनी दिला असून मतदारसंघाला योग्य न्याय मिळायला हवा, असे मत आशिष जैस्वाल यांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा:
१८ वर्षात नदालला १४ वे फ्रेंच ओपन विजेतेपद
नायजेरियात चर्चमध्ये झालेल्या गोळीबारात ५० जणांचा मृत्यू
रशिया- युक्रेन युद्धाच्या १०० दिवसांचा आढावा
उत्तरकाशीत बस दरीत कोसळून २५ भाविकांचा मृत्यू
राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलेलं असताना आता हा वाद समोर आला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून राज्यसभेची सहावी जागा जिंकण्यासाठी दोन्ही बाजूंनी ताकद लावली जात आहे. तसेच शिवसेनेने घोडेबाजार करत असल्याचा आरोप देखील केला आहे. मात्र, ‘घोडेबाजार’ या शब्दावरून अपक्ष आमदारांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.