23 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरराजकारण...जशी याच्या बापाची जहागिर होती

…जशी याच्या बापाची जहागिर होती

Google News Follow

Related

शिवसेना-राष्ट्रवादीतील मतभेद चव्हाट्यावर

महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल असल्याचं आमदार-मंत्री, पक्षातील नेते मंडळी दाखवतात. मात्र प्रत्यक्षात यापेक्षा चित्र वेगळं आहे. कारण परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या एका व्हिडीओने राष्ट्रवादी-शिवसेनेतला संघर्ष अधोरेखित झालाय. एका मेळाव्यात खासदार संजय जाधव बोलत असताना ते राष्ट्रवादीवर असे काही तुटून पडले की त्यांनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा बाप काढला. एवढ्यावरच ते शांत बसले नाहीत तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला बुडविण्याची भाषाही केली.

एका प्रकरणावर बोलताना संजय जाधवांनी छगन भुजबळांवर हल्ला चढवला. कमिशनरने आदेश देऊनही भुजबळांनी विरोधात पत्र लिहिलं, जशी याच्या बापाची जहागिर होती, असं म्हणत त्यांनी आपल्या मनातील संताप व्यक्त केला. हा संताप व्यक्त करताना त्यांच्या मनात राष्ट्रवादीबाबत किती राग आहे, याची झलक त्यांनी आपल्या भाषणातून दाखवली.

एका प्रकरणात आम्ही प्रतिष्ठा पणाला लावली… कमिशनरपर्यंत तक्रारी केल्या. कमिशनरने आदेश दिले, दुकानदाराला दुकान बहाल करा आणि त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा…. एवढं असतानाही भुजबळ साहेबांनी एक पत्र दिलं अन् याचं तात्पुरतं दुकान दुसऱ्याला जोडा, असं सांगितलं…. जसं काय याच्या बापाची जहागिरीच आहे, असा एकेरी हल्ला त्यांनी केला.

हे ही वाचा:

फडणवीस-शहा भेटीत काय होणार?

रंगकर्मींना खंडणीखोर सरकारने वाऱ्यावर सोडून दिले

रेल्वेशी चर्चा न करताच ठाकरे सरकारची घोषणा

अंध मोदी विरोधक यातून बोध घेतील का?

“आमच्याही भावना अनावर होतात हे लक्षात ठेवा. शेवटी काही मर्यादा असतात. कुठपर्यंत शांत बसायचं, कुठ पर्यंत सहन करायचं. जेव्हा माकडीण सुद्धा स्वत:ला बुडायची वेळ आल्यावर लेकराला पाया खाली घालते हे लक्षात ठेवा. तर राष्ट्रवादीला आम्ही केव्हाही पायाखाली घालू शकतो हे तुम्हाला सांगतो. शेवटी आम्ही आता सहनशीलतेच्या पलिकडे गेलो आहोत. काल जिल्ह्यात कलेक्टर बदलायचा होता. मी फक्त मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली होती. राष्ट्रवादीने एवढं रान पेटवलं जणू काही मोठा अपराधच केला होता. तुम्हाला सगळं जमतं. म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं बघायचं वाकून अशी अवस्था राष्ट्रवादीवाल्यांची आहे. तरी देखील मुख्यमंत्र्यांचा आदेश आम्ही शिरसावंद्य मानला. जे काही आदेश येईल ते मान्य केलं. पण प्रत्येक गोष्टीत सध्या खाजवाखाजवी सुरू आहे. ही वस्तुस्थिती आहे”, असं जाधव म्हणाले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा