31 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरराजकारणघरकोंबडा मुख्यमंत्री असल्यामुळे विरोधी पक्षनेत्याकडे दाद मागितली जाते

घरकोंबडा मुख्यमंत्री असल्यामुळे विरोधी पक्षनेत्याकडे दाद मागितली जाते

Google News Follow

Related

“ठाकरे सरकारची लफडी बाहेर आल्यापासून मुख्यमंत्री तोंड लपवून का बसलेत हा प्रश्न जनतेला पडलाय.” अशा शब्दात भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे. संजय राऊत यांनी (अनिल देशमुख ,परमबीर सिंह, १०० कोटी प्रकरणावर) मुख्यमंत्र्यांनी बोलावं असं यात काय आहे? असा सवाल केला होता. त्यावरच टीका करताना भातखळकरांनी हे ट्विट केले आहे.

संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यपाल आणि भाजपावर निशाणा साधला. ‘मुख्यमंत्र्यांनी या विषयावर बोलण्याची गरजच नाही.’ ‘मुख्यमंत्र्यांनी बोलावे असं यात काय?’ असे धक्कादायक विधान त्यांनी केले. त्याबरोबरच ‘भाजपाच्या दबावामुळे १२ आमदारांच्या नियुक्त्यांना राज्यपालांनी मंजूरी दिली नाही.’ असा आरोप देखील त्यांनी केला. ‘खुद्द मुख्यमंत्री, गृहमंत्री यांची चौकशी व्हावी अशी इच्छा आहे, परंतु विरोधी पक्षनेते चौकशी अधिकारी होऊ शकत नाहीत. त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी.’ असे विधान त्यांनी पुन्हा एकदा केले.

हे ही वाचा:

काँग्रेस अस्तित्वहीन पक्ष झाला आहे

सचिन वाझेच्या चौकशीतून पुढे येणार ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याचे नाव?

अमित शहांकडे आहेत आणखी काही लेटर बॉम्ब

“आपण दाबलेला रिपोर्ट फडणवीसांनी बाहेर कसा काढला यावर मुख्यमंत्री – गृहमंत्र्यांची चर्चा”

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी ‘फडणवीसांनी सादर केलेला अहवाल हा विझलेला लवंगी फटाका आहे.’ असे म्हटले. त्याबरोबरच या अहवालाला काडीचीही किंमत नसल्याचे त्यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्षनेते असताना ही माहिती कोणी पुरवली? याचा तपस करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे असे राऊत म्हणाले. याशिवाय, प्रशासनातले आणि ‘राजभवनातले’ सुद्धा भाजपचेच आहेत असाही आरोप संजय राऊत यांनी केला. यामध्ये परमबीर सिंह, रश्मी शुक्ला हे पोलीस अधिकारी तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर राऊत यांनी टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना अतुल भातखळकरांनी “नोकरशाही भाजपा सोबत आहे असे राउताना म्हणायचे आहे काय? राज्याचा घरकोंबडा मुख्यमंत्री फक्त टक्केवारी पुरता उरला असल्यामुळे लोक विरोधी पक्षनेत्याकडे दाद मागतायत दुसरं काय.” अशी जहरी टीका करणारे ट्विट केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा