आर्यन खानला आज मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तीन आठवड्यांहून अधिक काळ (२ ऑक्टोबरपासून) तुरुंगवास भोगल्यानंतर आज अखेर आर्यन खान तुरुंगाबाहेर पडणार आहे.
क्रूझ शिप पार्टीवर ड्रग्जच्या छाप्यांनंतर २ ऑक्टोबरपासून शाहरुख खानचा २३ वर्षीय मुलगा ताब्यात आहे. आर्यन खानला यापूर्वी दोनदा जामीन नाकारण्यात आला होता. आर्यन खान ८ ऑक्टोबरपासून तुरुंगात आहे. एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी क्रूझवर ड्रग्जच्या छाप्यानंतर त्याला ताब्यात घेतले होते. आर्यन खानला यापूर्वी दोनदा जामीन नाकारण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात त्याला जामीन नाकारणाऱ्या विशेष अंमली पदार्थ विरोधी न्यायालयाने सांगितले की त्याला त्याचा मित्र अरबाज मर्चंटच्या बुटात लपवलेल्या चरसबद्दल माहिती आहे. त्याचबरोबर त्यानी हे ड्रग्ज ‘जाणीवपूर्वक स्वतःच्या ताब्यात’ घेतले होते. आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मूनमुन धमेचालाही अटक करण्यात आली होती.
हे ही वाचा:
मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी बेमुदत संपावर
आजारी सचिन वाझे चांदीवाल आयोगापुढे गैरहजर
अमरिंदर सिंग-अमित शहा भेटीत युतीची चर्चा?
‘बुलढाणा अर्बन’ ची आयकर विभागामार्फत चौकशी
काल कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून आज दुपारी २:३० पर्यंत सुनावणी पुढे ढकलली होती. यावेळी अरबाजची बाजू मांडताना वरिष्ठ वकील अमित देसाई यांनी कट रचण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सांगितले. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने आरोप केल्यानुसार, “जर एकाच उद्देशासाठी तीन असंबद्ध व्यक्ती येत असतील तर ते षड्यंत्र नाही.” असे त्यांनी न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या खंडपीठाला सांगितले. व्हॉट्सऍप चॅटचा मुंबई क्रूझशी संबंध नसल्याच्या आर्यनच्या बाबतीत केलेल्या युक्तिवादाचा त्यांनी पुनरुच्चार केला. मंगळवारी, त्याने असा युक्तिवाद केला होता की आर्यन आणि एक मित्र यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट्सचा एनसीबीकडून ड्रग्सचा ‘चुकीचा अर्थ’ लावला जात आहे. त्यांचा हा संवाद ऑनलाइन पोकरबद्दल सुरु होता, असं ते म्हणाले होते.