आर्यन खान प्रकरण बनाव, सुनील पाटीलचा सहभाग

आर्यन खान प्रकरण बनाव, सुनील पाटीलचा सहभाग

गेले काही दिवस भारतभर गाजत असलेल्या मुंबई येथील ड्रग्स प्रकरणात आता एक नवीन अँगल समोर आला आहे. विजय पगारे नावाच्या इसमाने या प्रकरणात आपली साक्ष नोंदवली असून हे संपूर्ण प्रकरण बनाव असून पैसे उकळण्यासाठी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. यात सुनिल पाटील, मनिश भानुशाली, किरण गोसावी हे सारेच सहभागी असल्याचे त्याने म्हटले आहे. विशेष म्हणजे भाजपा नेते मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत ज्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुनील पाटील यांच्यावर आरोप केले त्या सुनील पाटील यांचे विजय पगारे हे निकटवर्ती आहेत.

ऐन दिवाळीत आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणात अनेक गौप्यस्फोट होताना दिसत आहेत. शनिवार ६ नोव्हेंबर रोजी एकीकडे भाजपा नेते मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाचे कार्यकर्ते असलेले सुनील पाटील हे क्रूज एक्सप्रेस प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचे मोहित कंबोज यांनी सांगितले.

हे ही वाचा:

सचिन वाझे १३ नोव्हेंबरपर्यंत कोठडीतच

दाऊदचा साथीदार चिंकू पठाण सोबत अनिल देशमुख काय करत होते?

कच्च्या तेलापाठोपाठ आता खाद्य तेलही झाले स्वस्त

अनिल देशमुखांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

तर यानंतर या प्रकरणात सुनील पाटील यांचे जवळचे मित्र असणारे विजय पगारे हे पुढे आले आहेत. आर्यन खान ड्रग्स प्रकरण घडण्याच्या आधी पासूनच पगारे हे सातत्याने सुनील पाटील यांच्यासोबत होते. तब्बल सहा महिने ते पाटील यांच्या सोबत होते. विजय पगारे आणि सुनील पाटील हे दोघेही मूळचे धुळ्याचे आहेत. पैसे उकळण्याच्या हेतूने या प्रकरणाचा बनाव रचण्यात आल्याचे पगारे यांनी सांगितले आहे. तर किरण गोसावी यांनी आर्यन खान सोबत काढलेला सेल्फी हा जाणीवपूर्वक काढला असून तो मुद्दाम व्हायरल करण्यात आला असा गौप्यस्फोटही पगारे यांनी केला.

या प्रकरणाआधी विजय पगारे आणि सुनील पाटील यांच्या वितुष्ट आले असल्याचे त्यांनी सांगितले. विजय पगारे यांनी मुंबईत पोलिसांसोबत आपली साक्ष नोंदवली असून या साक्षीमुळे आर्यन खान ड्रग्स प्रकरणात एक नवे वळण येऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.

Exit mobile version