लोकसभा निडवणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.दिल्ली काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा देणारे अरविंदर सिंग लवली यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अरविंदर सिंग लवली यांच्यासोबत अनेक काँग्रेस नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.आम आदमी पक्षासोबतच्या युतीबद्दल अरविंदर लवली नाराज होते.याबाबत काँग्रेस पक्षाकडे नाराजी व्यक्त करत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, दिल्ली भाजपचे प्रमुख वीरेंद्र सचदेवा आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत अरविंदर सिंग लवली यांचा पक्ष प्रवेश पार पडला. अरविंदर लवली यांच्यासोबत माजी आमदार नीरज बसोया, नसीब सिंग आणि माजी मंत्री राजकुमार चौहान तसेच माजी युवक काँग्रेस अध्यक्ष अमित मलिक यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
हे ही वाचा:
बंगालच्या राज्यपालांवर विनयभंगाचा आरोप, पोलिसांकडून तपास सुरु!
पाकिस्तानी नेत्यांना पुन्हा एकदा राहुल गांधींचा पुळका; राहुल हे नेहरूंसारखे समाजवादी असल्याची पोस्ट
कल्याण ग्रामीणमध्ये ठाकरेंना धक्का; उपजिल्हाप्रमुखांसह माजी नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश
”गरिबांचे आशीर्वाद हेच माझे भांडवल”
दरम्यान, अरविंदर सिंग लवली यांनी अलीकडेच दिल्ली युनिटच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिली होता.आम आदमी पक्षासोबत काँग्रेसने आघाडी केल्यामुळे राजीनामा देत आहे, असे त्यांनी सांगितले होते.याबाबत त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली होती.त्यांनी आपल्या पत्रात लिहिले होते की, दिल्लीमध्ये ज्या पक्षासोबत काँग्रेस पक्ष विरोधात होता.काँग्रेसने त्यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय घेतला.बनावट आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले.
अशा स्थितीतही दिल्ली काँग्रेसने आम आदमी पक्षासोबत आघाडी केली आहे, असे सांगत लवली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.दरम्यान, अरविंदर सिंग लवली हे काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर कोणत्या पक्षात सामील होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.अखेर त्यांनी आज दिल्लीतील भाजप कार्यालयात जाऊन अनेक नेत्यांसह भाजपात प्रवेश केला आहे.