अरविंद केजरीवाल विलगीकरणात

अरविंद केजरीवाल विलगीकरणात

राजधानी दिल्लीतील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललीय. कोरोनाचा विळखा सोडवण्यासाठी दिल्लीत पुढील आठवडाभर दिल्लीत लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय. अशावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर अरविंद केजरीवाल स्वत: विलगीकरणात गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सुनिता केजरीवाल या होम क्वारंटाईन झाल्या आहेत.

अरविंद केजरीवाल यांना जून २०२० मध्येही कोरोनाची लक्षणं आढळून आली होती. पण त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. दिल्लीतील कोरोनाची स्थिती गंभीर बनली असताना केजरीवाल स्वत: मैदानात उतरुन उपाययोजना करत होते. यांनी अनेक बैठकांसह दौरेही केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील कोरोना स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. दिवसेंदिवस चिंताजनक आकडेवारी समोर येतेय. काल दिवसभरात दिल्लीमध्ये २३ हजाराच्या घरात नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते.

हे ही वाचा:

दादरचे भाजी मार्केट बंद होणार?

नावात ‘ऑक्सिजन’ असल्याचा असाही फायदा

निलेश राणेंची उद्विग्न प्रतिक्रिया, म्हणाले मंत्राना गोळ्या घातल्या पाहिजेत

शिंगणेंच्या खुलाशाने नवाब मलिक यांचा खोटारडेपणा उघड

देशाच्या राजधानीमध्ये कोरोनाची चौथी लाट आली आहे. नवी दिल्लीतील आरोग्य यंत्रणा कोलमडली नाही मात्र, आरोग्य यंत्रणेच्या क्षमतेएवढे रुग्ण आढळत आहेत. या परिस्थितीमुळं नवी दिल्लीमध्ये पुढील आठवडाभर लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना त्यांनी सहकार्य करण्याचं आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. राज्यात २५ हजार कोरोना रुग्ण आढळत आहेत. या रुग्णसंख्या आणि दिल्लीची आरोग्य यंत्रणा जवळपास सारखी आहे. यामुळं यंत्रणेवर ताण आला आहे. सरकारकडून आरोग्य यंत्रणा कोलमडली जाऊ नये यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

Exit mobile version