केंद्रात भाजपाला पर्याय म्हणून विरोधकांनी ‘इंडिया’ नावाची आघाडी उभारली आहे. या आघाडीची बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. या इंडिया आघाडीमधील काही पक्षांनी पंतप्रधान नेते पदावर दावा सांगितला आहे. काँग्रेसकडून राहुल गांधी, तृणमूलमधून ममता बॅनर्जी आदी नेत्यांनी पंतप्रधान पदासाठी दावा सांगितला आहे. दरम्यान, या आघाडीतील आम आदमी पक्षाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवण्याची मागणी केली आहे.
आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्या पियंका कक्कर म्हणाल्या की, देशातील महागाई पाहता अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवलं जावं. अरविंद केजरीवाल हे पंतप्रधान पदाचे उमेदवार बनावेत असं मला वाटतं. देशभरात महागाईमुळे लोकांचे हाल होत आहेत. त्यामानाने देशाची राजधानी दिल्लीमध्ये महागाई सर्वात कमी आहे, असं त्या म्हणाल्या.
दिल्लीमध्ये मोफत पाणी, मोफत शिक्षण, मोफत वीज, महिलांसाठी मोफत बस सेवा, वृद्धांसाठी मोफत तीर्थ यात्रा अशा सुविधा दिल्या जात आहेत. याशिवाय सरप्लस बजेट सादर केला गेला. अरविंद केजरीवाल सतत नेहमी लोकांचे प्रश्न उपस्थित करत असतात. पंतप्रधान मोदी यांना आव्हान देण्यासाठी केजरीवाल हेच सक्षम आहेत. तेच त्यांना आव्हान देऊ शकतात,” अशी भूमिका प्रियंका कक्कर यांनी मांडली.
हे ही वाचा:
रेल्वे यंत्रणांचे नुकसान करणाऱ्याला होणार १० वर्षांची शिक्षा
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंच्या कंपनीविरोधातील केसचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयकडून सादर
ब्रिक्स परिषदेदरम्यान नेते मोदींच्या शेजारी बसू पाहात होते!
रक्षाबंधन अर्थात राखी पौर्णिमेचे महत्त्व
मात्र, अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत प्रवेश केल्यानंतर आता इंडिया आघाडीमध्येचं अंतर्गत आणखी स्पर्धा निर्माण झाली आहे. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव हे सुद्धा या शर्यतीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचा नक्की चेहरा कोणता, असा प्रश्न उपस्थित झाल्याच्या चर्चा आहेत.