दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या फुकटच्या सल्ल्याने नेटकरी नाराज झाले आहेत. त्यामुळे केजरीवाल यांच्या विरोधात समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या दिसत आहेत. याला कारण ठरले आहे काश्मीर फाईल्स या चित्रपटा संदर्भात अरविंद केजरीवाल यांनी केलेले वक्तव्य! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दिल्ली विधानसभेत बोलत होते. विधानसभेतील भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी हा चित्रपट दिल्लीत करमुक्त करावा अशी मागणी केली होती.
त्या अनुषंगाने केजरीवालांनी आपल्या भाषणात तारे तोडले. काश्मीर फाईल्स करमुक्त करा असे सांगण्यापेक्षा त्या विवेक अग्निहोत्रींना सांगा की संपूर्ण चित्रपट युट्युबवर टाका. लोक फुकटात बघतील. काश्मीरी पंडितांच्या नावावर लोकं करोडो रुपये कमावत आहेत आणि भाजपाचे आमदार या चित्रपटांचे पोस्टर लावत फिरतायंत अशी मुक्ताफळे केजरीवाल यांनी उधळली. याच वेळी केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाचे आमदार हसत होते.
हे ही वाचा:
“तेजस ठाकरेसुद्धा ‘त्या’ कंपनीत पार्टनर” किरीट सोमय्यांचा दावा
बायज्यूजकडे फिफा फुटबॉल विश्वचषकाचे प्रायोजकत्व
‘बीडीडी चाळ आता बाळासाहेब ठाकरे, राजीव गांधी, शरद पवार नगर म्हणून ओळखणार’
सरनाईकांचे २ फ्लॅट आणि भूखंड जप्त
केजरीवाल यांच्या या भाषणातून असंवेदनशीलता दिसत असल्याची भावना लोक व्यक्त करत आहेत. काश्मिरी पंडितांच्या नरसंहारावर बनलेल्या एका गंभीर कलाकृतीबद्दल केजरीवाल हसत हसत असंवेदनशीलपणे भाष्य करत असल्याचा सर्वानीच निषेध केला आहे. याबाबत राहुल रोशन यांनी ट्विट करत केजरीवाल यांच्या खलिस्तानी समर्थक असल्याबाबत अप्रत्यक्ष भाष्य केले आहे.
Nice that the charlatan is back to being Hinduphobe. Looks like Kumar Vishwas was right. Independent country ka PM banne ka plan hai https://t.co/yUkGoX8QEg
— Rahul Roushan (@rahulroushan) March 24, 2022
तर काश्मिरी हिंदू पावन दुराणी यांनीही केजरीवाल यांच्यावर कडक शब्दात टीका केली आहे. “बिट्टा कराटे याने आम्हाला उघड्यावर मारले तर अरविंद केजरीवाल यां विधानसभेत आमची हत्या केली.” अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत.
I am pained today ! If Bitta Karate killed us in open , Kejriwal killed us in Delhi assembly
— Pawan Durani (@PawanDurani) March 24, 2022