तुरुंगातून बाहेर येताच केजरीवाल भविष्य सांगू लागले!

पंतप्रधान कोण होणार, निवडणूक कोण जिंकणार, कोण तुरुंगात जाणार याचे करू लागले भाकीत

तुरुंगातून बाहेर येताच केजरीवाल भविष्य सांगू लागले!

आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळाल्यानंतर त्यांनी लागलीच प्रचाराला सुरुवात केली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी राजकीय भविष्येही वर्तविण्यास प्रारंभ केला. कोण पंतप्रधान होणार, कोण तुरुंगात जाणार, कोणता पक्ष निवडणूक जिंकणार किंवा कुणाचा पराभव होणार अशी अनेक भविष्ये त्यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केव्हा निवृत्त होणार याचेही भाकीत यानिमित्ताने करून टाकले. त्यांनी म्हटले की, २०२५मध्ये मोदी हे निवृत्त होतील. तेव्हा ते ७५ वर्षांचे होणार आहे. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा, सुमित्रा महाजन हे नेते ७५ वर्षानंतर निवृत्त झाले त्याप्रमाणे मोदीही होतील.

त्यांनी लोकसभा निवडणुकीबद्दलचे आणखी एक भाकीत केले की, जर केंद्रात मोदींचे सरकार आले तर दोन महिन्यांनी उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांना हटवले जाईल आणि अमित शहांना पंतप्रधान केले जाईल, अमित शहा मोदींची गॅरंटी पूर्ण करतील का?

हे ही वाचा:

ट्रकच्या धडकेत गाडी उलटली आणि बाहेर पडले सात कोटी!

विश्वंभर चौधरींनी पळ काढला

वरुण गांधींना भाजपने तिकीट द्यायला हवे होते

खळबळजनक! आई, पत्नी, मुलांची हत्या करून आरोपीची गोळ्या झाडून आत्महत्या

५० दिवस तुरुंगात घालविल्यानंतर बाहेर आलेल्या केजरीवाल यांनी सांगितले की, आपल्याला कोणत्याही पदाची लालसा नाही. देशासाठी १०० मुख्यमंत्रीपदांचा आपण त्याग करू. मुख्यमंत्रीपद हे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही. हे सांगतानाच केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा का दिला नाही याचेही समर्थन त्यांनी केले. जर आपण राजीनामा दिला तर आपले सरकार केंद्राकडून पाडले जाईल ही शक्यता होती.

केजरीवाल यांनी सांगितले की, जर तुम्ही लोकशाहीला तुरुंगात टाकाल तर तुरुंगातून लोकशाही कशी चालवली जाते हे मी दाखवून देईन.

Exit mobile version