26 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरक्राईमनामाशिवसेनेच्या अटक झालेल्या नेत्यांचे गॉडफादर कलानगरमध्ये बसलेले आहेत काय?

शिवसेनेच्या अटक झालेल्या नेत्यांचे गॉडफादर कलानगरमध्ये बसलेले आहेत काय?

Google News Follow

Related

शिवसेनेच्या अटक झालेल्या आणि चौकशी होत असलेल्या नेत्यांची नावे मनसुख हिरेन प्रकरणाशी कशी जोडली जातात? सचिन वाझेंचे गॉडफादर कलानगरमध्ये बसलेले आहेत काय?, असा सवाल भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना हा सवाल केला आहे. अटक होणाऱ्या किंवा चौकशी होणाऱ्या सर्वच शिवसेना नेत्यांची नावे मनसुख हिरेन प्रकरणाशी कशी जोडली जात आहेत. या सगळ्यांमध्ये शिवसेना हीच कॉमन लिंक आहे. २०१९ मध्ये एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेतून विधानसभा लढवली आहे. मूळ मुद्दा एवढाच आहे की या सर्व प्रकरणाशी शिवसेनेची लिंक काय आहे? वाझेंचे गॉडफादर कलानगरला बसले आहेत काय?, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.

सगळ्या संशयाच्या सुया एकाच दिशेनं जात आहेत. या मागचा मास्टरमाईंड कलानगरला बसला आहे. एनआयएने डायरेक्ट कलानगरमधून चौकशी सुरू करावी. कलानगरात मनसुखचे मुख्य आरोपी आहे. तिथेच हेड क्वॉर्टर आहे, असा दावाही त्यांनी केला. अनिल परब हे वाझेंचे बॉस आहेत. ते वाझेंसाठी अधिवेशनात भांडत होते. मुख्यमंत्रीही त्याची बाजू घेत होते. वाझे काय लादेन आहे का? असं मुख्यमंत्री म्हणत होते. हिरेन प्रकरणी एनआयए काम करत आहे. अधिवेशनात आम्हाला काय करायचं ते करूच. ज्या गोष्टी करणं गरजेच्या आहेत, त्या करणारच, असं त्यांनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा :

मराठा, ओबीसींच्या आरक्षणावरून ठाकरे सरकारने मोठं षडयंत्र रचलं

ठाकरे सरकार विरुद्ध नाशिकमध्ये ओबीसी मोर्चा

सीबीएसईचे निकाल ३१ जुलै रोजी जाहीर होणार

रत्नागिरीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

मराठा समाज असो, ओबीसी असो की धनगर समाज असो. सर्वांना सरकारने नाराज केलं आहे. ओबीसींचं आरक्षण उडवून लावलं आहे. या सगळ्या गोष्टी अति होत चालल्या आहेत. मंत्र्यांच्या गाड्या फुटतील तेव्हा समाज किती नाराज आहे हे कळेल, असा इशाराही त्यांनी दिला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
218,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा