शिवसेना खासदार संजय राऊत यांना राजकीय पातळीवर झटके बसत असताना आता त्यांना मोठा झटका देणारा निर्णय शिवडी न्यायालायने दिला आहे. संजय राऊत यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीनंतर अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे.
संजय राऊत यांनी वारंवार आपल्यावर बिनबुडाचे आरोप केले अशी तक्रार मेधा सोमय्या यांनी शिवडी न्यायालयात केली होती. त्यानंतर न्यायालयाने संजय राऊत यांना समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र संजय राऊत हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात आता अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
‘मविआ सोडा, मोदींशी चर्चा करा’
कल्याण डोंबिवली, पुण्यातही शिवसेनेला खिंडार
गोळीबारात जखमी झालेले जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे मृ्त्युमुखी
‘धनुष्यबाण कुणीही हिरावून घेऊ शकत नाही’
संजय राऊत यांनी मेधा सोमय्यांवर १०० कोटी रुपयांच्या कथित शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यांनतर १८ मे रोजी मेधा यांनी राऊत यांच्याविरोधात महानगराच्या शिवडी न्यायालयात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. १०० कोटींच्या कथित शौचालय घोटाळ्याप्रकरणी मेधा सोमय्यांनी तक्रार दाखल केली होती. राऊत यांनी केलेले आरोप निराधार आणि बदनामीकारक असल्याचा दावा तक्रारीत केला होता. तसेच मुंबई उच्च न्यायालयात मेधा सोमय्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला होता.