अशी अडकली निकिता जेकब!

अशी अडकली निकिता जेकब!

बंगलोरच्या दिशा रवी हिला टूलकिट प्रकरणात अटक केल्यानंतर आता दिल्ली पोलिसांच्या रडारवर आणखीन दोन नावे आली आहेत. निकिता जेकब आणि शंतनू अशा दोन कार्यकर्त्यां विरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात लावली गेलेली कलमे ही अजामीनपात्र आहेत. पण निकिता जेकबने या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे आणि चार आठवड्यांपर्यंत अटकेपासून अभय मागितले आहे. निकिता जेकब ही पेशाने वकील असून ती आम आदमी पक्षाची कार्यकर्ती असल्याची चर्चा आहे.

ग्रेटा थनबर्ग हिने ट्विटरवर अनवधानाने शेअर केलेल्या टूलकिटवरून दिल्ली पोलिसांनी ४ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात अटकसत्र सुरु झाले असून दिशा रवी या पहिल्या आरोपीला पोलिसांनी १४ फेब्रुवारी रोजी बंगलोर मधून अटक केली. या अटकेनंतर लगेचच आता पोलिसांनी निकिता जेकब आणि शंतनू यांच्या विरोधात अटक वॉरंट काढला आहे. टूलकिट बनवण्यात आणि पसरवण्यात निकिता हिचीही महत्वाची भूमिका असण्याची दाट शक्यता आहे.

असे आले निकिताचे नाव समोर…
निकिता जेकब हिच्या विरोधात लीगल राईट्स ऑबजर्वेटरी या सामाजिक संघटनेने तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगानेच ‘न्युज डंका’ ने या संस्थेच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला. ग्रेटाने शेअर केलेल्या टूलकिट डॉक्युमेंट मधेच खाली ‘मॉडिफाईड बाय निकिता जोसेफ’ असे दिसत होते. तसेच या घटनेनंतर निकिता हिने आपले ट्विटर खाते अचानक डिलीट केले. त्यामुळेच संशय येऊन निकिता हिच्या विरोधात तक्रार केल्याचे लीगल राईट्स ऑबजर्वेटरीच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

ग्रेटा टूलकिट प्रकरणात झाली पहिली अटक! अटक झालेली दिशा रवी आहे तरी कोण?

निकिता जेकब हिच्याशी पोएटिक जस्टीस फाउंडेशनच्या एम.ओ.धालीवाल यांनी ट्विटर स्टोर्मसाठी संपर्क साधला होता असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

चार दिवसांपूर्वी निकिता हिच्या घरी जाऊन पोलिसांच्या एका विशेष पथकाने तपासही केला होता. त्यानंतर पोलीस तिच्या चौकशीसाठी घरी गेले होते पण त्यावेळी निकिता घरी नव्हती.

Exit mobile version