भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चा, महाराष्ट्रचे अध्यक्ष संजय पांडे यांनी या संकट काळात चुकीची माहिती पसरवणारी ट्वीट्स करण्याच्या खोडसाळपणाबद्दल साकेत गोखले यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्याबरोबर त्यांनी ‘अरेस्ट साकेत गोखले’ (#ArrestSaketGokhale) हा प्रसिद्ध हॅशटॅग देखील जोडला आहे.
महाराष्ट्रात कोरोना वेगाने पसरत आहे. अनेक रुग्णांना रेमडेसिवीर औषधाची गरज पडत आहे, आणि त्यामुळे राज्यात या औषधाचा भयंकर तुटवडा निर्माण झाला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दमण-दीव मधून ब्रुक फार्मा या कंपनीकडून रेमडेसिवीर आणवण्याची तजवीज केली.
हे ही वाचा:
साकेत गोखले यांच्याविरोधात तक्रार दाखल
ठाकरे सरकार या प्रश्नांची उत्तरे देणार का?
दिल्लीत सोमवारपर्यंत पूर्ण लॉकडाऊन
देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना या सर्व प्रकरणांची कल्पना दिली होती. मात्र तरीदेखील पोलिसांनी या कंपनीच्या डायरेक्टरला अटक केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याविरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांना सोडून देण्यात आले.
मात्र तरीदेखील साकेत गोखले यांनी अत्यंत खोटी आणि बिनबुडाची बातमी देणारे ट्वीट्स करण्याचा खोडसाळपणा केला होता. या ट्वीट्स मधून त्यांनी अत्यंत गंभीर आरोप कोणतेही पुरावे न देता केले होते. त्यामुळे संजय पांडे यांनी साकेत गोखले यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
या ट्वीटसोबत त्यांनी साकेत गोखले यांना अटक करण्याची मागणी करणारे हॅशटॅग देखील जोडले आहे. हे हॅशटॅग मात्र चांगलेच गाजलेले दिसत आहे. ते आता तिसऱ्या क्रमांकाचे लोकप्रिय हॅशटॅग झाले आहे.