रेड्डीला झालेली अटक हा राज्यातील प्रत्येकाचा विजय

रेड्डीला झालेली अटक हा राज्यातील प्रत्येकाचा विजय

दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात रेड्डीला झालेली अटक हा राज्यातील प्रत्येकाचा विजय आहे असे मत भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी व्यक्त केले आहे. राज्यातील महिलांचे प्रश्न आक्रमकपणे मांडणाऱ्या चित्रा वाघ यांनी या अटकेचे श्रेय आवाज उठवणाऱ्या प्रत्येकाचे आहे असे मत मांडले आहे. पण हे म्हणतानाच त्यांनी महाराष्ट्र सरकारला धारेवरही धरले आहे.

बहुचर्चित मेळघाटच्या वन परिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले. अमरावती पोलिसांनी रात्री उशिरा नागपूरात कारवाई करत रेड्डीच्या मुसक्या आवळल्या. दिपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये लिहलेल्या वरिष्ठ अधिकारी शिवकुमारला याआधीच अटक केली असून श्रीनिवास रेड्डी यांची चौकशी सुरू होती. ही चौकशी झाल्यानंतर रेड्डीवर कारवाई करत त्याला अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

‘अपोलो-११’चे वैमानिक मायकल कॉलिन्स यांचे निधन

“भारताला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे”, प्रिन्स चार्ल्स

कोविडकाळात नागरिकांना सैन्याची साथ

टाटा स्टीलचे ऑक्सिजन उत्पादन ८०० टन प्रतिदिनांवर

रेड्डीच्या अटकेचे लोकांकडून स्वागत केले जात आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीदेखील हा राज्यातील प्रत्येकाचा विजय आहे असे म्हणत या कारवाईचे स्वागत केले आहे. पण याचवेळी त्यांनी सरकारने या घटनेतून बोध घ्यावा असे म्हणत ठाकरे सरकारचे कान उपटले आहेत. शासकीय, निमशासकीय आणि खासगी कंपनीत आयसीसी कमिटी बंधनकारक करत त्यांचे ऑडिट व्हावे अशी अपेक्षा चित्रा वाघ यांनी व्यक्त केली आहे.

कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या विरोधात जो विशाखा कायदा तयार करण्यात आला आहे, त्याच्यानुसार राज्यात ज्या आस्थापनांमध्ये २० पेक्षा अधिक महिला कर्मचारी असतील तेथे इंटर्नल कम्प्लेंट कमिटी असणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्य सरकारने ही कमिटी बंधनकारक करत त्याचे ऑडीट करावे अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

Exit mobile version