राणेंची अटक हा देशपातळीवरचा गेम?

राणेंची अटक हा देशपातळीवरचा गेम?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अटक हा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. नारायण राणे यांना झालेली अटक ही राजकीय सूडबुद्धीने करण्यात आली असून बेकायदेशीरपणे करण्यात आल्याचा आरोप भाजपाकडून सुरवातीपासूनच करण्यात आला. पण आता या अटकेमागे आता देशपातळीवरचे काही षडयंत्र आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

याला कारणही तसेच आहे. नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करणारे आणि राणे यांच्या अटकेचे आदेश देणारे नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचे पत्रकार परिषदेतील एक विधान याला कारणीभूत ठरले आहे. नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी बुधवार २५ ऑगस्ट रोजी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना अनौपचारिक बोलताना एक विधान केले. ते विधान होते ‘हा देशपातळीवरचा गेम आहे’. हे विधान माध्यमांच्या कॅमेरात टिपले गेले. यामुळेच आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे. हा देशपातळीवरचा गेम नक्की काय आहे आणि तो कोण खेळताय? असे अनेक प्रश्न सध्या विचारले जात आहेत.

सोनिया गांधींच्या सल्ल्याने नारायण राणेंची अटक?
भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरवरून दीपक पांडे यांचा व्हिडीओ शेअर करत सवाल उपस्थित केला आहे. भातखळकर म्हणतात ‘नाशिकचे पोलीस आयुक्त नक्की कशाला म्हणतायत की हा देश पातळीवरचा गेम? केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अटक काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सल्ल्याने झाली आहे का? राज्याच्या पोलिस संचालकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करायला हवी.’

Exit mobile version