अनिल देशमुख यांची अटक निश्चित

अनिल देशमुख यांची अटक निश्चित

अनिल देशमुख यांची अटक आता निश्चित झाली आहे असं म्हणत भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी पुन्हा एकदा देशमुखांवर निशाणा साधला आहे. अनिल देशमुख यांना अटकेपासून संरक्षण द्यायला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे ज्याक्षणी अनिल देशमुख अज्ञातवासातून बाहेर येतील त्या क्षणी त्यांना अटक होईल असे सोमैय्या यांचे म्हणणे आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या ईडी आणि सीबीआयच्या रडारवर आहेत. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात तसेच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या शंभर कोटींच्या वसुलीच्या आरोपांमुळे देशमुख यांच्या मागे केंद्र यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. या प्रकरणांची संबंधित देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या घरांवर ही छापेमारी करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

अनिल देशमुख २ ऑगस्टला ईडीसमोर हजर होणार?

ठाकरे सरकार म्हणजे दर चार दिवसांनी नवी पुडी सोडून वेळ मारून न्यायची

पीव्ही सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक

वीजबिल माफीवर सवाल केला आणि साहेबांचा मूड गेला

शुक्रवार, ३० जुलै रोजी माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स पाठवले आहे. ईडीने देशमुख यांना यापूर्वी तीनवेळा समन्स पाठवले आहेत. गेल्यावेळी अनिल देशमुख यांनी प्रकृतीचं कारण देत ईडी चौकशी टाळली होती. मात्र, आता पुन्हा एकदा ईडीने देशमुख यांना समन्स पाठवले आहेत. या समन्सनुसार देशमुख यांना २ ऑगस्टला ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखव व्हावे लागणार आहे.

यावरूनच भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी देशमुखांवर हल्ला चढवला आहे. अनिल देशमुख यांची अटक निश्चित झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण द्यायला नकार दिला आहे. त्यामुळे ज्या क्षणी अनिल देशमुख हे ईडी किंवा सीबीआयच्या हाती येणार त्या क्षणी त्यांना अटक होणार असे सोमैय्या यांचे म्हणणे आहे. अनिल देशमुख यांची हजार कोटींची मालमत्ता सीबीआयच्या लक्षात आली आहे. आता फक्त किती दिवस अनिल देशमुख लपून राहतात हे बघायचे असे सोमैय्या यांनी म्हटले आहे.

Exit mobile version