दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून यामुळे आमदार आदित्य ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. दिशाच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून या प्रकरणात सामुहिक बलात्कार, हत्या झाल्याचा आरोप केला आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही या याचिकेत आरोप करण्यात आले आहेत. किशोरी पेडणेकरांनी दिशाभूल केल्याचाही आरोप याचिकेत आहे. हे प्रकरण पुन्हा प्रकाशझोतात आल्यानंतर भाजपा मंत्री नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले की, ही एक साधी सोपी सरळ केस आहे. दिशा सालियन प्रकरण हे आत्महत्येसंबंधी होते तर ८ जूनपासून ते आत्तापर्यंत पळापळी, लपवालपवी का चालली आहे? आदित्य ठाकरेंना यातून वाचवावं का लागतं आहे, असे काही सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचे एक जजमेंट आले होते त्यानुसार, कोणावरही बलात्काराचा चार्ज असेल तर सर्वात पहिले त्याच्याविरोधात केस रजिस्टर करावी लागते. त्या नियमानुसार, केस दाखल करून आदित्य ठाकरेंना अटक करावी, त्यांची चौकशी करावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. ज्या कोणाचे नाव या प्रकरणात असेल, जो न्याय अन्य लोकांना लागतो, तोच न्याय आदित्य ठाकरेंना लावावा, अशी भूमिका घेत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंच्या अटकेची मागणी केली आहे.
आदित्य ठाकरे, सूरज पंचोली, दिनो मौर्य यांची चौकशी करावी, प्रकरणात सहभागचं नसेल तर चौकशीमधून सर्व स्पष्ट होईलचं. शिवाय आम्हा सर्वांची तोंडे बंद होऊन जातील, असे नितेश राणे म्हणाले. आदित्य ठाकरेंना विश्वास आहे की हे प्रकरण आत्महत्येचेचं आहे तर त्यांनी पळापळ न करता थेट चौकशीला सामोरे जावे. खरं काय ते सांगून पुरावे द्यावेत आणि आम्हा सर्वांना खोटं ठरवावं, असं नितेश राणे म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
दिल्लीमधील ‘अकबर रोड’ लिहिलेल्या साइन बोर्डला काळे फासून महाराणा प्रताप यांचा लावला फोटो
नागपूर हिंसाचार प्रकरणाचा मास्टरमाइंड फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा
दिशा सालियन हत्या प्रकरण आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या अंगाशी येणार?
युद्धग्रस्त गाझामधील परिस्थितीबद्दल भारताने व्यक्त केली चिंता
दिशा हिचे वडील आता अनेक गोष्टी सांगत आहेत. सूरज पंचोली, दिनो मौर्य यांची नावे राजकारण्यांनी घेतली नसून तिच्या वडिलांनी घेतली आहेत. किशोरी पेडणेकर तेव्हा दबाव टाकत होत्या हे दिशाचे वडील म्हणत आहेत, त्यामुळे यात आता आणखी बोलण्यासारखे काही नाही. त्यामुळे आदित्य ठाकरेंना अटक करून चौकशी करावी. न्यायालयात हे प्रकरण असून न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई होईल, असंही नितेश राणे म्हणाले.