सर्व संकटांत भारतीयांच्या मदतीला धावणारे सैन्य आता कोविड विरूद्धच्या लढाईतही मदतीला धावले आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी काल मोदींची भेट घेतली. त्यावेळी कोरोना विरूद्धच्या लढ्यातील सैन्याच्या तयारी बद्दल त्यांनी मोदींना माहिती दिली. हवाई दलाची मालवाहू विमानं सध्या देशातील विविध भागांत ऑक्सिजन टँकर पोहोचवण्यात मदत करत आहेत तर सैन्याने आपल्या हॉस्पिटल्समध्ये देखील उपचारांची सोय केली आहे. मोदी सरकारने सैन्याच्या घेतलेल्या मदतीबद्दल भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे.
हे ही वाचा:
जबाबदारी ढकलणं ही ठाकरे सरकारची ओळख- रावसाहेब दानवे
पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राला काय काय दिले?
देशावरच्या परकीय आक्रमणाच्या संकटात आपल्या प्राणाची बाजी लावून देश रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्याने आता आपले निवृत्त वैद्यकीय अधिकारी कोरोना विरुद्धच्या लढाईत उतरवायचे ठरवले आहे. भारतीय सैन्याचे आभार आणि हा धाडसी निर्णय घेणाऱ्या मोदी सरकारचे त्रिवार अभिनंदन
असे म्हटले आहे.
सैन्यातून गेल्या दोन वर्षात निवृत्त झालेल्या किंवा स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या वैद्यकिय कर्मचाऱ्यांना सेवा देण्यासाठी परत बोलावण्यात आलं आहे. या कर्मचाऱ्यांची नेमणूक दोन प्रकारे करण्यात येणार आहे. त्यांना कोविड केंद्रांमध्ये नेमलं जाईल किंवा जिथे ते राहतात तिथेच त्यांना सेवा देण्यास सांगण्यात येईल, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका निवेदनात देण्यात आली आहे.
सैन्यातून निवृत्त झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आपत्कालीन हेल्पलाइनद्वारे नागरिकांनी मदत करण्यास सांगण्यात आलं आहे. नौदल, लष्कर आणि हवाई दलाचे सर्व प्रमुख मुख्यालयांमधील अधिकाऱ्यांचीही सेवा घेतली जात आहे. लष्कराच्या वैद्यकीय पायभूत सुविधांचा उपयोग सामान्यांसाठी केला जाईल. याशिवाय हवाई दलाकडून देशात ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे काम करत आहे, अशी माहिती जनरल रावत यांनी पंतप्रधान मोदींना दिली.