रझा अकादमी, अर्जुन खोतकर नितेश राणेंच्या निशाण्यावर

रझा अकादमी, अर्जुन खोतकर नितेश राणेंच्या निशाण्यावर

nitesh rane meets pratik pawar in karjat, dist- ahamadnagar

शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि रझा अकादमीच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात यावी असे पत्र भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट केले आहे.काही दिवसांपूर्वी अर्जुन खोतकर यांनी वादग्रस्त भाषण केल्यामुळे हिंसा भडकली असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे. अमरावतीमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर राणे यांनी सरकारवर निशाणा साधत रझा अकादमीवर बंदी घालण्यात यावी असे सांगितले होते; नाहीतर महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही त्यांना संपवू, असा इशाराही दिला होता.

भाजप आमदार नितेश राणे यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून अर्जुन खोतकर यांनी केलेल्या भाषणाचा संदर्भ देत या वादग्रस्त भाषणामुळेच हिंसा झाल्याचे म्हटले आहे. पत्रामध्ये राणे यांनी कोणकोणत्या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे हे ही नमूद केले आहे.

अर्जुन  खोतकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात यांनी मुल्सिम समुदायासमोर भाषण करताना हिंदू मुसलमानांमध्ये फूट पडणारे केंद्रात सत्तेत बसले आहेत असे म्हटले आहे. तर “जिथे कुराण जाळले जाईल, मशीद तोडली जाईल, भगवदगीता मोडली जाईल तिथे त्या विरोधात आपण लढू. आम्ही तुमच्या सोबत आहोत. या लढाईत आम्ही तुमच्या सोबत आहोत. इन्शाह अल्लाह काहीही झाले तरी आम्ही तुमच्या सोबत राहू.” असे अर्जुन खोतकर या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत.

हे ही वाचा:

बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनावर शरद पवारांची वादग्रस्त प्रतिक्रिया

‘विदर्भातील राष्ट्रवादीचे दुकान बंद व्हायला किती वेळ लागतो’

‘शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही’

बाबासाहेब पुरंदरेंना मान्यवरांची आदरांजली

त्रिपुरातील हिंसाचाराच्या कथित घटनेच्या अफवेनंतर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पडसाद उमटले होते. कुठे दगडफेक तर कुठे जाळपोळ अशा घटना घडत आहेत. मालेगाव, अमरावती आणि नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. या ठिकाणी दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली होती.

Exit mobile version