27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणअर्जुन खोतकर उद्धव ठाकरेंकडे की शिंदेंकडे?

अर्जुन खोतकर उद्धव ठाकरेंकडे की शिंदेंकडे?

Google News Follow

Related

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अजून एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे जालन्यातील माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एकानाथ शिंदे आणि अर्जुन खोतकर यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

जालन्याचे माजी आमदार अर्जुन खोतकरांनी उद्धव ठाकरे यांना सोडचिट्ठी देऊन एकनाथ शिंदे यांची साथ दिल्यास मराठवाड्यातही उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार आहे. अर्जुन खोतकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून त्यावेळी भाजपाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते.

एकनाथ शिंदे यांच्या घेतलेल्या भेटीचा वेगळा उद्देश काढू नका मी शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबतंच राहणार असल्याचं अर्जुन खोतकर यांनी सांगितलं आहे. मी शिवसैनिकचं आहे. अद्याप मी शिंदे गटात गेलेलो नाही. माझ्या वैयक्तिक कामासाठी गेल्याचे स्पष्टीकरण अर्जुन खोतकर यांनी या चर्चांनंतर दिले आहे.

हे ही वाचा:

पुण्यात शिकाऊ विमान शेतात कोसळलं, पायलट जखमी

“आदिवासी मुलगी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहचते हे लोकशाहीचे सामर्थ्य”

मै द्रौपदी मुर्मू….. देशाच्या १५ व्या राष्ट्रपतींनी घेतली शपथ!

ऑगस्ट महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद!

एकीकडे शिवसेनेला खिंडार पडत असून आमदार, खासदारांपाठोपाठ अनेक नगरसेवक, पदाधिकारी, जिल्हाप्रमुख, कार्यकर्तेही एकनाथ शिंदे यांच्या बाजूने येत आहेत. तर दुसरीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे हे पक्ष सावरण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा