‘अर्जुन खोतकर मॉल, कमर्शियल कॉम्प्लेक्ससाठी १०० एकर जागा हडपण्याच्या प्रयत्नात’

‘अर्जुन खोतकर मॉल, कमर्शियल कॉम्प्लेक्ससाठी १०० एकर जागा हडपण्याच्या प्रयत्नात’

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्यावर आरोप केला होता. अर्जुन खोतकर यांनी जालना येथील साखर कारखाना विक्रीत १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर ईडीने अर्जुन खोतकरांच्या घरावर शुक्रवारी छापा टाकला. आज किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन खोतकर यांच्यावर नवा आरोप केला आहे. अर्जुन खोतकर यांनी मॉल, कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि इमारतीसाठी १०० एकर जागा हडपण्याचा प्रयत्न केला आहे, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे.

हे ही वाचा:

किशोर खोखो संघांच्या कर्णधारपदी सोत्या वळवी आणि सानिका चाफे!!. 

मुंबई हादरली! कुर्ल्यामध्ये तरुणीची बलात्कारानंतर हत्या

सीआयडीकडून परमबीर यांना दोन समन्स

परदेशी चलनाची तस्करी करणाऱ्या दोघांना मुंबई विमानतळावरून अटक! सापडले एवढे कोटी

अर्जुन खोतकर यांनी साखर कारखान्यात घोटाळा तर केला पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कृपेने याच कारखान्याच्या संबंधित १०० एकर शासकीय जागा गिळंकृत करण्याचा घोटाळा सुरू असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. सरकारने साखर कारखान्यासाठी जागा दिली होती. त्या जागेची किंमत ४०० कोटी आहे. सर्व मिळून २४० एकर जागा आहे. त्याची किंमत एक हजार कोटी आहे. आता ईडीने व्यवस्थित तपास सुरू केला आहे. आयकर विभागालाही त्याची तक्रार केली आहे. आयकर विभागही बेनामी व्यवहाराचा तपास करणार आहे.

आयकर विभागही बेनामी व्यवहाराचा तपास करणार आहे. मुळे आणि तपाडीया परिवार आणि सहआयुक्त नांगरे पाटील यांची पत्नी रुपालीताई यांचे नावही पुढे येत आहे. मुंबईच्या सहआयुक्तांना मी भेटलो होतो. या घोटाळ्याचा तपास मी सहआयुक्त होण्यापूर्वी बंद केला होता. त्यात काहीच घोटाळा नाही, असे या सहआयुक्ताने सांगितले. एका सहआयुक्तांनी दुसऱ्या सहआयुक्ताला निर्दोष असण्याचे सर्टिफिकेट दिले, असे सोमय्या म्हणाले.

त्यानंतर आता ठाकरे सरकारला दोन वर्षे झाली असून शिवसेना नेत्यांच्या घोटाळ्यांचा आढावा त्यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितला.

Exit mobile version