शिवसेना आमदार अर्जुन खोतकर हे एकनाथ शिंदे यांना पाठींबा देणार का या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं होतं. मात्र, अर्जुन खोतकर यांनी आज, ३० जुलै रोजी पत्रकार परिषद घेऊन या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
जालना येथे अर्जुन खोतकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन करत असल्याचे जाहीर केले आहे. यावेळी अर्जुत खोतकर भावून झाले होते. आजपर्यंत पक्षाची प्रामाणिकपणे सेवा करत आलो आहे. पक्ष नेतृत्वाने जबाबदारी दिली त्याबद्दल आभार तसेच सामान्य माणसापर्यंत शिवसेना घेऊन गेलो आणि जनतेनेही विश्वास दाखवला. लोकांनी यश मिळवून दिलं त्यासाठी अर्जुन खोतकर यांनी जालनामधल्या मतदारांचे आभार मानले आहेत.
हे ही वाचा:
राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी
बाळासाहेबांचे नातू निहार ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने
मराठा समाजाचे ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द
राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानावरून वाद
आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. खासदार संजय राऊत यांच्याशीही बोललो. पक्षप्रमुखांची परवानगी घेतली आणि त्यांच्या साक्षीने एकनाथ शिंदे यांना समर्थन दिल्याचा निर्णय घेतला. कुटुंबाला होणाऱ्या त्रासामुळे, परिस्थितीनुसार हा निर्णय घेत असल्याचे अर्जुन खोतकर म्हणाले. “तुम्ही अडचणीत असाल तर जाऊ शकता,” असं उद्धव ठाकरे अर्जुन खोतकर यांना म्हणाले.