राज्यपालांकडे १२ आमदारांची नावं तरी दिलेली आहेत का?

राज्यपालांकडे १२ आमदारांची नावं तरी दिलेली आहेत का?

प्रवीण दरेकर यांचा सवाल

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात राज्यपालांवर केलेल्या टीकेवरून आता राजकारण तापले आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याबाबत महाविकास आघाडीला लक्ष्य केले आहे.

ते म्हणतात की, राज्यपालांच्या संदर्भात विधान परिषदेच्या नियुक्तीचा विषय न्यायालयात आहे. त्याच्यामुळे थोडी थांबण्याची गरज आहे. यासंदर्भात अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागविल्यावर कळले आहे की, अशी कोणतीही फाईलच नाही. या १२ आमदारांची नावं तरी दिलीत की नाही अशी मला शंका आहे. जर दिली असतील तर ती कोणती नावं दिली, त्याची पोच तर त्यांच्याकडे असणार ना. त्यांनी ही १२ नावं जाहीर करून टाकावी. खरे तर, १२ नावांच्या बदल्यात ५० लोकांना विधान परिषदेवर पाठवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे जर यादी जाहीर झाली तर बाकीचे या आमदारकीकडे डोळे लावून बसलेले उमेदवार काय प्रतिक्रिया देतील या चिंतेने महाविकास आघाडीला ग्रासले आहे. त्यामुळे जेवढे गुलदस्त्यात हे प्रकरण राहील तेवढे बरे असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणून त्यांनीच यादी एकदा जाहीर करावी.

हे ही वाचा:

‘छत्रपती संभाजी महाराजांबाबतचे ‘ते’ उल्लेख पुराव्यांच्या कसोटीवर न टिकणारे’

काँग्रेसचे गोडवे गाणाऱ्या देवरांना स्वराज कौशलनी सुनावले

संजय राऊतांची टीका हा निव्वळ पोरखेळ

आदित्य ठाकरे दाखवा आणि फुकट लसीकरण मिळवा

१२ आमदारांविषयी काळजी करताना २ कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, पालकही आहेत ते परीक्षेच्या संदर्भात चिंताग्रस्त आहेत. पालकांमध्ये संभ्रम आहे संजय़ राऊतांना त्याबद्दल बोलाय़ला वेळ नाही, असे सांगून दरेकर म्हणाले की, तौक्ते वादळाने कोकण उद्ध्वस्त झाले. त्यांना एक रुपयाचे पॅकेज द्यायला ठाकरे सरकारला वेळ नाही. त्यांना आमदारांची चिंता आहे.

नैसर्गिक आपत्ती व लसी संदर्भात राज्यपालांनी बोलावं अशा प्रकारचा सल्ला राऊत देतात. राऊतांचा सरकारवरच विश्वास नाही. लसीसंदर्भात राज्यपालांनी पाठपुरावा करावा अशी मागणीही ते करत आहेत याचा अर्थ ते राज्यसरकारला षंढ समजत आहेत की काय? राज्य सरकारमध्ये कुवत नाही, ते काही करू शकत नाहीत, त्यामुळे राज्यपालांनीच आता लक्ष घालावं अशीच राऊत यांची भूमिका असावी, असेही दरेकर म्हणतात.

Exit mobile version