आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये विजय मिळवून तिथे सरकार स्थापन केले. मात्र काही काळातच आपचे प्रमुख अरविंद केजरीवालांना त्यांच्या बड्या तीन नेत्यांनी धक्का दिला आहे. आपचे प्रदेशाध्यक्ष अनुप केसरी आणि संघटन सचिव सतीश ठाकूर आणि उनाचे जिल्हाध्यक्ष इकबालसिंह यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला.
पंजाबमधील विजयानंतर आप पक्षाने त्यांचा मोर्चा हिमाचल प्रदेशकडे वळवला होता. त्यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा भव्य रोड शो हिमाचल राज्यात केला . मात्र केजरीवाल यांचा हा आंनद क्षणिक होता. कारण त्याच रात्री उशिरा आपचे हिमाचल प्रदेशाध्यक्ष अनूप केसरी, सरचिटणीस सतीश ठाकूर आणि उनाचे जिल्हाध्यक्ष इक्बाल सिंग यांनी जे.पी.नड्डा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी या तिघांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. याची माहिती मंत्री अनुराग ठाकूर यांनीच ट्विट करुन दिली आहे.
आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी की नीति व नेतृत्व में विरोधी भी आस्था जता रहे हैं, क्योंकि उपेक्षा की, उत्पीड़न की, प्रताड़ना की नहीं बल्कि सबका साथ, सबका विकास सबका विश्वास के मूलमंत्र के साथ जोड़ने में भरोसा रखते हैं।
— Anurag Thakur (@ianuragthakur) April 8, 2022
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केजरीवाल यांनी हिमाचल प्रदेशमध्ये रोड शो केला होता. त्यावेळी केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याशिवाय कोणालाही वाहनावर जाण्यास परवानगी नव्हती. इतर नेत्यांकडे केजरीवाल यांनी डुंकूनही बघितले नाही असा आरोप हिमाचल प्रदेशच्या नेत्यांनी केला आहे.
हे ही वाचा:
नितीन गडकरी यांच्यानंतर, रावसाहेब दानवे गेले राज ठाकरेंच्या भेटीला
पृथ्वीराजच्या रूपात कोल्हापूरला मिळाली २१ वर्षांनी महाराष्ट्र केसरीची गदा
ठाण्यात रामनवमी निमित्त भव्य मिरवणूक
अखेर इम्रान खान क्लिन बोल्ड; पंतप्रधानपद गमावले
” केजरीवाल यांनी आम्हला निराश केले आहे. आम्ही पक्षसाठी रात्रंदिवस काम करतोय आणि त्यांनी आमच्याकडे ढुंकूनही बघितलं नाही. मंडी येथे झालेल्या रोड शोमध्ये फक्त अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनाच मानाचं स्थान होतं, असा दावा केसरी यांनी केला आहे. केजरीवालांनी आपच्या कार्यकर्त्यांचा अपमान केल्यानं त्यांनी पक्ष सोडला आहे, असा आरोप अनुराग ठाकूर यांनी केला आहे.