भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय असे नेते ठरले आहेत. पंतप्रधान मोदींचे अप्रूवल रेटिंग हे जगात सर्वाधिक आहे. जागतिक नेत्यांच्या अप्रूवल रेटिंगच्या यादीत ७० टक्के पसंती मिळवत नरेंद्र मोदी हे सर्वोच्च स्थानी आहेत. या क्रमवारीत मोदींनी पुन्हा एकदा जो बाईडन, बोरीस जॉन्सन, अँजेला मर्केल अशा सर्व दिग्गज जागतीक नेत्यांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगभर प्रचंड लोकप्रियता आहे. ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले ते एक राजकीय नेते आहेत. त्याचप्रमाणे जगात सर्वाधिक अपूर्वल रेटिंगही त्यांनाच प्राप्त आहे. अमेरिकेतील मॉर्निंग कन्सल्ट ही डाटा इंटेलिजन्स फर्म जगभरातील नेत्यांची लोकप्रियता तपासून त्यांना अप्रूवल रेटिंग देत असते. या सर्वे एजन्सीने २ सप्टेंबर रोजी जागतिक नेत्यांचे अप्रूवल रेटिंग जाहीर केले. जगभरातील १३ देशांमध्ये हा सर्वे करण्यात आला आहे. ज्यामध्ये देशातील प्रौढ नागरिकांचे मत जाणण्याचा प्रयत्न केला आहे.
हे ही वाचा:
शिवसेना आमदाराच्या उपस्थितीत ‘जुलूस जबरदस्ती’
जावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा
बोरिवलीत इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग, जीवितहानी टळली
रोहितच्या ऐतिहासिक शतकामुळे भारत मजबूत स्थितीत
या सर्वेच्या निष्कर्षानुसार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ७० टक्के अप्रूवल रेटिंग घेऊन प्रथम स्थानी आहे. तर त्यांच्या मागे मेक्सिकोचे राष्ट्रप्रमुख लोपेज ओब्राडोर हे दुसऱ्या स्थानावर आहेत. तर जर्मनीच्या अँजेला मर्केल या चौथ्या स्थानी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाईडन हे पाचव्या स्थानी आहेत. तर जपानचे पंतप्रधान सुगा हे सर्वात कमी म्हणजेच २५ टक्के अप्रूवल रेटिंग सह अखेरच्या म्हणजेच १३ व्या स्थानी आहेत.
जून महिन्यातही मॉर्निंग कन्सल्ट या संस्थेने अशाच प्रकारचा एक सर्वे केला होता. तेव्हाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जगातील सर्वाधिक लोकप्रियता असलेले नेते ठरले होते. तेव्हा मोदींचे अप्रूवल रेटिंग हे ६६ टक्के होते तर आता हे रेटिंग ७० टक्के झाले आहे. म्हणजेच जून ते सप्टेंबर या कालावधीत नरेंद्र मोदी यांचे अप्रूवल रेटिंग हे चार टक्क्यांनी वाढल्याचे दिसत आहे.