प्रसिद्ध लेखिका सुधा मुर्ती यांची राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. सुधा मुर्ती यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत नरेंद्र मोदींनी याची घोषणा केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत सुधा मूर्ती यांच्या नियुक्तीबद्दलची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “भारताच्या राष्ट्रपतींनी सुधा मूर्ती यांचं नामांकन राज्यसभेसाठी केल्यानं मला आनंद होत आहे. सुधा मूर्ती यांचं सामाजिक कार्य, शिक्षण यांसह विविध क्षेत्रातील योगदान मोठं आणि प्रेरणादायी आहे. राज्यसभेतील सुधा मूर्ती यांची उपस्थिती असणं ही आमच्या ‘नारी शक्ती’चा एक शक्तिशाली पुरावा आहे. त्यांचा संसदेतील सहभाग हा आपल्या देशाचं नशीब घडवण्यात असलेलं महिलांच्या सामर्थ्याचं उदाहरण आहे. त्यांना संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा.”
I am delighted that the President of India has nominated @SmtSudhaMurty Ji to the Rajya Sabha. Sudha Ji's contributions to diverse fields including social work, philanthropy and education have been immense and inspiring. Her presence in the Rajya Sabha is a powerful testament to… pic.twitter.com/lL2b0nVZ8F
— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2024
प्रख्यात उद्योजक नारायण मूर्ती यांच्या पत्नी असलेल्या सुधा मूर्ती यांनी त्यांच्या सामाजिक कार्य आणि लेखनाच्या माध्यमातून या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा जन्म १९ मे १९५० रोजी कर्नाटकातल्या शिगगावमध्ये झाला. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमध्ये बीई केलं आहे. त्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा म्हणून काम पाहतात. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. २००६ मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात आला होता. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून साहित्य क्षेत्रातले अनेक नामवंत पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
हे ही वाचा:
“मराठा आरक्षणाअंतर्गत होत असलेली भरती प्रक्रिया न्यायालयाच्या अधीन राहणार”
१० बस बदलल्या, वेगवेगळे कपडे घातले.. बेंगळुरू कॅफे बॉम्बस्फोट संशयितांची माहिती समोर!
अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिनात ‘उघडपणे’ शस्त्र बाळगण्यास परवानगी!
महिला झाल्या सबल, देशाची वाढली ताकद!
इन्फोसिस फाऊंडेशनच्या माध्यमातून सुधा मूर्ती यांनी समाजाच्या विविध क्षेत्रांत विकासकामांना प्रोत्साहन दिले आहे. कर्नाटक सरकारच्या शाळांमध्ये त्यांनी संगणक आणि ग्रंथालये उपलब्ध करून दिली आहेत. कर्नाटकातील ग्रामीण भागांत आणि बंगळूरू शहर आणि परिसरात त्यांनी सुमारे १०हजार शौचालये संस्थेच्या माध्यमातून बांधली आहेत. तामिळनाडू आणि अंदमान येथे त्सुनामीच्या काळात त्यांनी विशेष सेवा कार्यही केले आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील लोकांनाही त्यांच्या संस्थेने मदत दिलेली आहे.