रमापती शास्त्री यांची प्रो-टेम स्पीकर म्हणून नियुक्ती!

रमापती शास्त्री यांची प्रो-टेम स्पीकर म्हणून नियुक्ती!

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी भारतीय जनता पार्टीचे सर्वात ज्येष्ठ आमदार रमापती शास्त्री यांना विधानसभेचे प्रो-टेम स्पीकर म्हणून शपथ दिली आहे. राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही उपस्थित होते. प्रो-टेम स्पीकरची शपथ घेतल्यानंतर शास्त्री अयोध्येत पोहचले असता त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. संघाचे महानगर सर संघचालक डॉ.विक्रम पांडे यांच्या नेतृत्वाखाली या स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सहकाऱ्यांच्या स्वागताने भारावून गेलेल्या श्री शास्त्रींनी सर्वांचे आभार मानले.

आता लोकसभा अध्यक्षांची निवडणूक २९ मार्चला म्हणजेचं उद्या होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या पदासाठी सतीश महाना यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. त्यांची बिनविरोध निवड झाल्याचीही चर्चा होत आहे.

रमापती शास्त्री यांची २३ मार्च रोजी प्रो-टेम स्पीकर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यासोबतच नवीन विधानसभेचे नवनिर्वाचित सदस्य सुरेश कुमार खन्ना, जय प्रताप सिंग, राम पाल वर्मा आणि माता प्रसाद पांडे यांनाही शपथ देण्यात आली. हे सर्व लोक २८-२९ मार्च रोजी नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणार आहेत. रमापती शास्त्री आठव्यांदा आमदार झाले आहेत. राज्यपालांनी त्यांची प्रो-टेम स्पीकर म्हणून नियुक्ती केली होती. ज्येष्ठ आमदार असल्याने हंगामी सभापती म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यानंतर शनिवारी त्यांना शपथ देण्यात आली.

हे ही वाचा:

“हाव डॉ. प्रमोद पांडुरंग सावंत, देवाचो सोपूत घेता की…”

१ एप्रिलला पंतप्रधान मोदी ‘परीक्षा पे चर्चा’ करणार

पोस्ट टाकली म्हणून शिवसैनिकांनी मारले

ड्रेनेज टाकीत गाय पडली आणि…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित डॉ. पांडे म्हणाले की, रमापती शास्त्री हे उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी एकूण सात वेळा विधानसभा निवडणूक जिंकली असून सध्या राज्यात सर्वाधिक वेळा आमदार झालेल्या नेत्यांपैकी ते एक आहेत. सध्या ते योगी मंत्रिमंडळात प्रो-टेम स्पीकर आहेत.

Exit mobile version