भारताचा शेजारी देश श्रीलंका सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असून देशात राजकीय बदलही करण्यात आले आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबया राजपक्ष यांनी नवे मंत्रिमंडळ नियुक्त केले आहे. या नव्या मंत्रिमंडळात १७ जणांचा समावेश आहे. शिवाय पूर्वीच्या तीन मंत्र्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
नवीन कॅबिनेट मंत्र्यांना अध्यक्षांच्या उपस्थितीत अध्यक्षांच्या निवासस्थानी शपथ देण्यात आली. कोलंबोत आज, १९ एप्रिलपासून संसदेचे अधिवेशन सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अध्यक्ष राजपक्ष यांनी विरोधकांना शह देण्यासाठी १७ मंत्र्यांची मंत्रिमंडळात नियुक्ती केली आहे.
नव्या मंत्रिमंडळात कुटुंबातील सदस्यांना आणि यापूर्वी मंत्रिमंडळात असलेल्या चामल राजपक्ष, महिंदा राजपक्ष यांचा मुलगा नामल राजपक्ष यांना जागा दिलेली नाही. यापूर्वी सत्ताधारी पक्षाच्या एका खासदाराने सांगितले की, मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात येणार असून अध्यक्ष राजपक्ष आणि पंतप्रधान महिंदा राजपक्ष मात्र कायम राहतील. काही नवीन चेहऱ्यांसह युवकांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल. श्रीलंकेतील विरोधी पक्ष समागी जन बालवेगयाने अध्यक्ष राजपक्ष यांच्या सरकारविरोधात अधिवेशनात अविश्वास आणणार असल्याचा इशारा दिला आहे.
हे ही वाचा:
‘वेडे समजता का? पाणीपुरवठा करण्यात काय अडचण?’
अमरावती, मुंबईनंतर बीडमध्येही धार्मिक कार्यक्रमात हिंसाचार
कुचिक प्रकरणी माझ्यावरील आरोप धादांत खोटे
कुरापती चीनने सीमेवर उभारले तीन टॉवर
दरम्यान, काही दिवसांपूर्वी श्रीलंकेने स्वतःला दिवळखोर म्हणून घोषित केले होते. तर श्रीलंकेतील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून संतप्त जनता सरकारविरोधात रस्त्यावर उतरली होती.