राजस्थानी समाजात सक्रिय असलेले व्यापारी गजेंद्र भंडारी यांची मीरा-भाईंदर शहर जिल्ह्याच्या प्रवक्त्यापदी भाजपने नियुक्ती केली आहे. शुक्रवारी जिल्हाध्यक्ष रवी व्यास यांच्या हस्ते भंडारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. गजेंद्र भंडारी यांची नियुक्ती राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या शिफारशीवरून जिल्हाध्यक्ष रवी व्यास यांनी केली आहे. आपल्या नियुक्तीबाबत गजेंद्र भंडारी म्हणाले की, पक्षाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करणार आहे. मीरा-भाईंदर महापालिकेत भाजपची सत्ता आणून पक्षाला जनतेपर्यंत नेण्याचे काम करण्याचा पूर्णपणे मी प्रयत्न करणार आहे.
मीरा-भाईंदर शहर जिल्हा प्रवक्त्याच्या नियुक्तीचे स्थानिक भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी यांनी स्वागत केले आहे. भंडारी हे मीरा-भाईंदर नागरिक परिषदेत पहिल्यापासून सक्रिय आहेत.
हे ही वाचा:
पुणे इमारत स्लॅब दुर्घटना प्रकरणी चार जणांना अटक
सुरक्षा दलाकडून जम्मू- काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
१९९३ बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉन्टेड अबू बकरला अटक
दक्षिण कोरियन कंपनी केली मास्कची ‘नाक’बंदी
कोण आहेत हे गजेंद्र भंडारी?
मूळचे राजस्थानचे असलेले भंडारी हे राजस्थानी जन-जागरण सेवा संस्थेचे अध्यक्षही आहेत. राजस्थानी समाजातील सर्वात महत्त्वाचा आणि प्रसिद्ध सण गणगौर सुरू करण्याचे श्रेयही गजेंद्र भंडारी यांना जाते. हा सण केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
भंडारी दरवर्षी असहाय्य लोकांसाठी सामूहिक विवाहाचे कार्यक्रमही आयोजित करतात. त्यांचे व्यवसाय क्षेत्रातही नाव आहे. मार्बलचा व्यवसाय करणारे भंडारी हे विलेपार्ले मार्बल डीलर्स असोसिएशनचेही अध्यक्ष आहेत. तसेच जीतो आणि भारत जैन महामंडळासारख्या नामांकित संस्थांशीही संबंधित आहेत. याशिवाय, त्यांना महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष राज के. पुरोहित हे मुंबई भाजप अध्यक्ष आणि ज्येष्ठ आमदार मंगल प्रभात लोढा यांच्यासारख्या राजस्थानी नेत्यांच्या जवळचे मानले जाते.