सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्यांचा माफीनामा

सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्यांचा माफीनामा

‘द वीक’ या इंग्रजी मासिकाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्या प्रकरणी माफीनामा सादर केला आहे. ‘द वीक’च्या ताज्या अंकात हा माफीनामा प्रकाशित करण्यात आला आहे. ‘द वीक’ या मासिकाने निरंजन टकले यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करणारा लेख प्रकाशित केला होता. या लेखावरूनच माफी मागायची नामुष्की मासिकावर ओढवली आहे.

२०१६ साली २४ जानेवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करणारा एक लेख द वीक या मासिकात छापण्यात आला होता. ‘लॅम्ब लायनाईझ्ड’ या शीर्षकाखाली छापण्यात आलेल्या या लेखात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने खोटे आणि चुकीचे संदर्भ देण्यात आले होते. निरंजन टकले यांनी हा लेख लिहिला होता. या लेखाविषयी सावरकर प्रेमींमध्ये प्रचंड संताप उसळला असून, स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी कारण्याच्याच हेतूने हा लेख लिहिला गेला असल्याचे मत सावरकरप्रेमींनी व्यक्त केले होते. हा लेख छापल्याबद्दल द वीक विरोधात न्यायालयीन लढा लढण्यात आला. अखेर या लढ्याला यश आले असून ‘द वीक’ ने हा लेख छापल्याबद्दल माफी मागितली आहे.

हे ही वाचा:

मुंबईत आज-उद्या लसीकरण बंद ठेवून काय वीकेंड साजरा करायचा आहे का?

ठाकरे सरकारचे मंत्री फक्त बोलतात, आणि भरडली जाते जनता

आता तरी कोकणवासींना पुन्हा निसर्गाच्या हवाली सोडू नका

ठाकरे सरकार खोटं बोलत होतं- विनायक मेटे

द वीकने छापलेल्या माफीनाम्यात ते म्हणतात, “२४ जानेवारी २०१६ रोजी द वीकमध्ये विनायक दामोदर सावरकर यांच्या संदर्भातील एक लेख छापण्यात आला होता. ‘लॅम्ब लायनाईझ्ड’ या मथळ्याखाली हा लेख छापण्यात आला असून कन्टेन्ट पानावर ‘हिरो टू झिरो’ असे लिहिले होते. या लेखाद्वारे गैरसमज करून घेण्यात आला असून वीर सावरकर यांच्यासारख्या उच्च उंचीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल चुकीचा अर्थ लावण्यात आला. आम्हाला वीर सावरकरांबद्दल नितांत आदर आहे. आम्ही छापलेल्या लेखामुळे कोणत्याही व्यक्तीस काही व्यक्तिगत हानी झाली असल्यास आम्ही व्यवस्थापन म्हणून खेद व्यक्त करतो आणि असा लेख छापल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.”

Exit mobile version