प.बंगालमध्ये निवडणुकांचा माहोल आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपली खुर्ची टीकवण्यासाठी हीरीरीने प्रचारात उतरल्या असून संगीत महोत्सवात त्या लोकाग्रहास्तव चक्क नाचल्या. लोकांना त्यांचे एक वेगळेच रूप पहायला मिळाले. परंतु काही वेळातच मुळ पदावर येत त्यांनी भाजपावर भरपूर तोंडसुख घेतले.
कोलकात्यातील संगीत महोत्सवाचे उद्घाटन करायला बॅनर्जी आल्या होत्या. याप्रसंगी त्यांनी काही सांस्कृतिक कलाकार, गायक, वादक यांचा सत्कारही केला. प्रसिद्ध संथाल नर्तिका बसंती हेम्बराम यांचा सत्कार केल्या नंतर त्यांनी ममता दीदींना नाचण्याचा आग्रह केला. निवडणूका तोंडावर असल्याने लोकाग्रह मोडणे दीदींनाही परवडणारे नाही. त्यामुळे दीदींनीही ठेका धरला.
ममता बॅनर्जी या चित्रकार आहेत. त्यांच्या चित्रे काही उद्योगपतींनी लाखो रुपये मोजून विकत घेतली आहेत. त्यांचे ‘का का छी छी’ हे सांगितीक भाषणही चांगलेच प्रसिद्ध झाले होते. आज त्यांचा एक नवा पैलू जनतेसमोर आला.