22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरराजकारण"राज्यातील कोणताही सरपंच या मुख्यमंत्र्यांपेक्षा हुशार"

“राज्यातील कोणताही सरपंच या मुख्यमंत्र्यांपेक्षा हुशार”

Google News Follow

Related

“महाविकासआघाडीचे सरकार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कृपेमुळे बसलं आहे. नाहीतरं असा मुख्यमंत्री कोणी केला असता? उद्धव ठाकरेंचं कोणीही ऐकत नाही. म्हणूनच महाराष्ट्राची ही अवस्था आहे.” असा प्रहार माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी केली. या राज्यातील कोणताही सरपंच या मुख्यमंत्र्यांपेक्षा कितीतरी हुशार आणि कायदे माहिती असलेला आहे,” अशीही टीका राणेंनी केली.

“उद्धव ठाकरेंचे कोणीही ऐकत नाही. कारवाई केली तर हातात आहेत तीही लोक पळतील. ते घरातून बोलतात. लोकांसमोर येऊन बोलत नाहीत. ते मंत्रालयात येत नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकांना सांगतात, इतरांना ५० माणसं जमवू द्यायची नाहीत आणि संजय राठोडवर काय कारवाई केली? टीव्हीवरुन बोलत असताना लोकांना प्रश्न विचारतात तुम्ही काही उत्तर देत नाही. लोकं समोर नव्हते. त्यांचं कोणीही ऐकत नाही. म्हणूनच महाराष्ट्राची ही अवस्था आहे,” असेही नारायण राणे म्हणाले.

हे ही वाचा:

“या लोकांना अत्याचार करायला लायसन्स दिलंय का?”- नारायण राणे

तुम्ही मेहनत करुन क्लिप बाहेर काढली, पण एवढं असताना चौकशी होत नाही. त्या ऑडिओ क्लिपमध्ये आवाज कोणाचा आहे? संभाषण कोणाचं आहे? तिला डॉक्टरकडे ने, हे कर ते कर, हा आवाज कोणाचा आहे? संजय राठोड १५ दिवसांनी सांगतात, भाजपा माझं कुटुंब उद्धवस्त करायला निघालाय, भाजपला काही कामधंदे नाहीत का?? असा सवालही राणेंनी उपस्थित केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा