‘पराभवाच्या भीतीने राहुल गांधी प्रचारात नाहीत’

सुरत मधील प्रचार सभेमध्ये अनुराग ठाकूर बोलत होते.

‘पराभवाच्या भीतीने राहुल गांधी प्रचारात नाहीत’

हिमाचल प्रदेशची विधानसभा निवडणूक पार पडली, तर आता आगामी गुजरातच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी पराभवाच्या भीतीने निवडणुकीच्या प्रचारापासून दूर आहेत,असा टोला ठाकूर यांनी लगावला आहे.

सुरत मधील प्रचार सभेमध्ये अनुराग ठाकूर बोलत होते. ते म्हणाले, गुजरात, हिमाचल प्रदेश राज्यांमधील प्रचारापासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी दूर राहणे आश्चर्यजनक आहे. निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होणार असल्याची भीती असल्याने त्यांच्या कुटुंबावर दोष न येता पक्षाच्या नव्या अध्यक्षांना ते जबाबदार ठरविता यावे, हा हेतू त्यामागे आहे.

काँग्रेस पक्ष सध्या बुडत आहे. काँग्रेसचे अस्तित्व संपत चालले असून त्यांचे नामोनिशाण कोठेही दिसत नाही. निवडणूक होणाऱ्या राज्यांमध्ये राहुल गांधी आले नाहीत, यामागे काँग्रेसचा कोणता राजकीय डाव आहे का हे आम्हाला समजले पाहिजे, असंही अनुराग ठाकूर म्हणाले.

भारत जोडो यात्रेबद्दल ठाकूर म्हणाले, राहुल गांधी तुकडे गँग सोबत भारत जोडो यात्रा करत आहेत. हिंदू दहशतवादावर ते बोलले, जेएनयूमध्ये भारताचे तुकडे करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभे राहिले आणि आता ते वीर सावरकरांवर प्रश्न उपस्थित करत आहेत. ही काँग्रेसची मानसिकता आहे, त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या पलीकडे काहीच दिसत नाही, असा आरोपही ठाकूर यांनी केला आहे.

हे ही वाचा : 

सजा की मजा! तिहार तुरुंगात सत्येंद्र जैन यांनी घेतला मसाजचा आनंद

स्कुल व्हॅन चालकाने विद्यार्थ्यांनीवर अतिप्रसंग करण्याचा केला प्रयत्न

श्रद्धा वालकर, लव्ह जिहाद आणि हिंदू-मुस्लिम विवाह

धक्कादायक! समाजसेविकेनेच पाच दिवसांचे बाळ विकले

गुजरातमधील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ‘डबल इंजिन’ सरकावर विश्वास असल्याने भाजपा मोठ्या मताधिक्क्याने निवडणूक जिंकेल, असा विश्वासही अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version