लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात नव्या कृषी कायद्यांवरून चांगलीच जुंपलेली आहे. विरोधी पक्षांच्या प्रश्नांना सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने उत्तरे दिली जात आहेत. भाजपाकडून सातत्याने कृषी कायद्यांतील वाईट बाबींवर चर्चा करण्याचे आवाहन होत असताना, काँग्रेसकडून मात्र मुद्देसूद उत्तरे दिली जाऊ शकलेली नाहीत.
हे ही वाचा:
नुकताच लोकसभेत असाच आणखी एक किस्सा घडला. काँग्रेसचे खासदार रवनीत सिंग बिट्टू यांनी कृषी कायद्यांविषयी बोलायला सुरूवात केली. मात्र बोलताना ते म्हणाले की ‘या कायद्यात मंडी बंद करून खासगी मंड्यांची निर्मीती करण्यात येईल.’ मात्र यावर भाजप सभासदांनी तिव्र आक्षेप नोंदवला. कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाचे राज्यमंत्री आणि भाजपाचे खासदार अनुराग सिंह ठाकूर यांनी लोकसभेत प्रतिप्रश्न केला आणि ‘कोणत्या कलमाखाली मंडी बंद करणार असल्याचा उल्लेख केला आहे ते दाखवावे’ असे आव्हान देखील केले. या बाबतचा लोकसभेतला व्हिडियो देखील त्यांनी ट्वीट केला आहे.
Congress MP caught LYING in Parliament.
Fails to answer which clause says
“Mandis will be scrapped”.Watch this 👇🏼 pic.twitter.com/Udx5eM124M
— Anurag Thakur (@ianuragthakur) February 9, 2021
अधिवेशनाच्या सुरूवातीपासूनच या अधिवेशनावर शेतकरी आंदोलनाची छाया आहे. जरी हे अर्थसंकल्पीय अधिवेशन असलं तरीही सातत्याने कथित शेतकऱ्यांच्या आंदोलनाची चर्चा होत आहे. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण चालू असताना काँग्रेस सदस्यांनी त्यात वारंवार अडथळा देखील निर्माण केला आणि नंतर सभात्याग देखील केला.