पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात दारिद्र्य रेषेखालील गरीब आता त्या परिस्थितीतून बाहेर येऊ लागले आहेत. हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळात झाले आहे, असा दावा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला आहे. हमीरपूर येथे सोमवार,२० जून रोजी त्रिदेव संमेलन पार पडले, त्या संमेलनात अनुराग ठाकूर बोलत होते.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात दारिद्र्य रेषेखालील गरीब आता दारिद्र्य रेषेतून बाहेर येऊ लागले आहेत. यावरून अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, माजी पंतप्रधान इंदिरा गांधींपासून ते काँग्रेस नेते सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी गरिबी हटाओच्या घोषणा दिल्या. फक्त घोषणाच ऐकता आल्या गरिबी निर्मूलन झाले नाही. मात्र ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करून दाखवले आहे. जर आपण मागील प्रशासनावर अवलंबून असतो, तर आपल्याला दुसऱ्या देशांवर कोरोना लशींसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावे लागले असते. मात्र पंतप्रधान मोदींचे आभार ! आता आपल्याकडे दोन कोविड लसी आहेत, असे अनुराग ठाकूर म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
मलिक, देशमुखांची ‘सर्वोच्च’ निराशा
सिद्धू मुसेवाल हत्येप्रकरणी मोठी कारवाई, शस्त्रसाठा जप्त
धक्कदायक! सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील नऊ जणांची आत्महत्या
मुख्यमंत्रीपद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशिवाल्या मावळ्याचा!
कोविडच्या काळात संघर्ष दिसला. भाजपा कार्यकर्त्यांनी निःस्वार्थपणे लोकांची सेवा केली. गरजू लोकांना मास्क आणि राशनचे वाटप करण्यात आले. केंद्र सरकारने कोरोना महामारीत अनेक योजना राबवल्या. उपासमारीपासून लोकांचा बचाव, अर्थव्यवस्था वाचवणे हे कोणत्याही मंत्र्यासाठी आव्हान होते, मात्र ते भाजपाने करून दाखवले आहे. या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवसातील वीस वीस तास काम केले आहे.