महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने घेतलेल्या मेळाव्यात मशिदीवरील भोंगे हटविण्याची मागणी केली होती. तसेच जर ते हटवले गेले नाहीत, तर त्यासमोर हनुमान चालीसा लावण्यात यावी असे सांगितले होते. यावरून राज्याच्या राजकारणात आरोपप्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. यावर आता प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
अनुराधा पौडवाल म्हणाल्या की, भारतामध्ये आता अजानसाठी लाऊडस्पिकरचा वापर करणं बंद करायला हवं. मी माझ्या गायनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक देशांचे दौरे केले आहेत. त्यामध्ये मला अजानसाठी लाऊडस्पिकर हे फक्त भारतातच दिसले. अन्य देशांमध्ये असे काही नाही. मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. मात्र, जर कोणत्याही चुकीच्या गोष्टीला जाणीवपूर्वक प्रोत्साहन दिले जात असेल तर त्याचा विचार व्हायला हवा. जर मशिदीमध्ये अजानसाठी लाऊडस्पिकरचा वापर केला जातो तर बाकीच्या धर्माचे लोक मागणी करणार की आम्हाला देखील लाऊडस्पिकरचा वापर करण्याची परवानगी द्या,” असे मत अनुराधा पौडवाल यांनी मांडले आहे.
हे ही वाचा:
ईडीची कारवाई झालेल्या संजय राऊतांचं शिवसैनिकांकडून जंगी स्वागत
विकृतीने ओलांडल्या मर्यादा! घोरपडीवर बलात्कार केल्याप्रकरणी तरुण अटकेत
यशवंत जाधवांच्या डायरीत ‘मातोश्री’नंतर आता केबलमॅन, M-TAI
विक्रांत घोटाळ्याचे पुरावे राऊतांनीच द्यावेत! पण त्यांच्याकडे कागदोपत्री कोणताच पुरावा नाही
मशिदीबाहेर असलेल्या भोंग्यांवरून सध्या राजकारणात वातावरण चांगलेच तापले असून मनसे विरुद्ध महाविकास आघाडी सरकार अशी राजकीय लढाई सुरू आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्याची मागणी केली होती. तसेच जर ते हटवले गेले नाहीत, तर त्यासमोर हनुमान चालिसा लावण्यात यावी, असे सांगितले होते. त्यानंतर काही शहरांमध्ये भोंगे लाऊन हनुमान चालीसा वाजवण्यातही आली.