27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरराजकारणपक्षविरोधी वक्तव्य भोवले, हाजरा यांची भाजपा सचिवपदावरून हकालपट्टी!

पक्षविरोधी वक्तव्य भोवले, हाजरा यांची भाजपा सचिवपदावरून हकालपट्टी!

भाजपाने घेतला निर्णय

Google News Follow

Related

भाजप नेते अनुपम हाजरा यांची राष्ट्रीय मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी एका पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. या पत्रात लिहिले आहे की, ‘भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या सूचनेनुसार अनुपम हाजरा यांना राष्ट्रीय मंत्रिपदावरून मुक्त करण्यात आले आहे. ही माहिती तत्काळ प्रभावाने लागू होईल.दरम्यान,लोकसभा निवडणुकीपूर्वी महत्वाची धोरणात्मक बैठक घेण्यासाठी बंगालमध्ये मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जेपी नड्डा गेले होते.या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.अनुपम हाजरा यांना तात्काळ राष्ट्रीय सचिवपदावरून हटवण्यात आले आहे.

व्यासपीठावर जाहीरपणे पक्षविरोधी वक्तव्ये करणाऱ्या अनुपम यांच्यावरील ही दुसरी कारवाई आहे.या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांची केंद्रीय सुरक्षा हटवण्यात आली होती.लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाविरोधात बंडखोरी वृत्ती स्वीकारणाऱ्या नेत्यांसाठी हा मोठा संदेश मनाला जात आहे. यासोबतच अनुपम हाजरा यांच्या भाजपमधील भवितव्याबाबतही प्रश्न विचारले जात आहेत.याआधीही कोणतीही माहिती उघड न करत केंद्रीय नेतृत्वाने त्यांची सुरक्षा काढून घेतली होती.

हे ही वाचा:

  युपीत नायब तहसीलदार मशिदीत पढत होता नमाज

येरुणकर हत्येसाठी शस्त्र पुरवणाऱ्या ज्वेलर्ससह दोन जण अटकेत

वर्ल्ड कप फायनलमध्ये जमा झालेल्या प्लास्टिक कचऱ्यातून बेंच, जॅकेट

रिझर्व्ह बँक धमकी प्रकरणी पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या

अनुपम हाजरा यांनी भाजपच्या अनेक नेत्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते.याबाबत त्यांना भाजपकडून वारंवार इशारा देखील देण्यात आला होता आणि काही बोलायचे असेल तर पक्षाची अंतर्गत बैठक असते आहे त्यात तुमचे विषय मांडा, असे सांगण्यात आले होते.असे उघडपणे बोलून पक्षाला अडचणीत आणू नका, असे त्यांना सांगण्यात आले होते.मात्र, असे असूनही ते हार मानत न्हवते.यानंतर बंगाल मधून त्यांची भाजप पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी वारंवार केली जात होती.मात्र, केंद्राकडून यावर मौन बाळगले.आता मंगळवारी त्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा