मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामिन मंजूर

मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामिन मंजूर

समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामिन मंजूर झाला आहे. पुणे महापालिकेतर्फे कोंढव्यात हज हाऊस बनविण्याचे काम चालू करण्यात आले होते. या हज हाऊसला विरोध करताना धार्मिक भावना दुखावणारे तसेच भडकावू भाषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. याबद्दल न्यायलयात खटला सुरू असून, न्यायलयाने एकबोटे यांचा अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे.

मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात संभाजी ब्रिगेडने फिर्याद दाखल केली होती. अतिरिक्त सत्र न्यायधीश जी. पी. अग्रवाल यांच्या न्यायालयाने एकबोटे यांचा जामिन मंजूर केला आहे. ॲडव्होकेट एस. के. जैन आणि ॲडव्होकेट अमोल डांगे यांनी एकबोटे यांच्या जामिनासाठी अर्ज केला होता.

हे ही वाचा:

शिवसेनेच्या मंत्र्याने शेतकऱ्यांचे थकवले कोट्यवधी रुपये

रेखा जरे प्रकरणातील सुत्रधार ताब्यात

एकबोटे यांच्यावर एफआयआर उशिरा दाखल करण्यात आली आहे. त्याबरोबरच सदर जागा महानगरपालिकेच्या ताब्यात असून अर्जदारही पोलिस तपासात सहकार्य करत आहे. शिवाय या प्रकरणात पोलिसी चौकशीची गरज नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने हा जामिन मंजूर केला आहे.

एकबोटे यांच्याविरोधात शाहाफाजिल सिद्दीकी आणि सतिश काळे यांनी फिर्याद दाखल केली होती. कोंढव्यात बांधण्यात येत असलेल्या हज हाऊसला विरोध करताना धार्मिक भावना दुखावणारे आणि भडकावू भाषण केल्याचा आरोप केला होता.

 

Exit mobile version