कमिन्सच्या दातृत्वाने मोदी विरोधकांना पोटशूळ

कमिन्सच्या दातृत्वाने मोदी विरोधकांना पोटशूळ

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने भारत सरकारला कोवीड काळात मदत करण्यासाठी मदतीचा हात दिला. ‘पीएम केअर्स’ फंडाला कमिन्सने पन्नास हजार डॉलर्सची देणगी दिली. पण या देणगीमुळे मोदी विरोधकांना मात्र पोटशूळ झाला आहे. ‘पीएम केअर्स’ फंडाला मदत करू नकोस असे आवाहन या मंडळींनी ट्विटरवरून केले आहे.

भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अत्यंत हिंमतीने सामना करत आहे. भारताला अनेक देशांनी मदत केली तर आहेच, परंतु त्याशिवाय अनेक व्यक्तींनी देखील मदत देऊ केली आहे. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्स याने पीएम केअर्ससाठी तब्बल पन्नास हजार डॉलरची देणगी ऑक्सिजनच्या खरेदी करण्यासाठी केली आहे.

पॅट कमिन्सने भारताच्या ऑक्सिजन खरेदीसाठी पीएम केअर्ससाठी दान देताना इतर क्रिकेट खेळाडूंना देखील दान देण्याचे आवाहन केले आहे. त्याबरोबरच भारतावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला त्याने पीएम केअर्समध्ये दान देण्यासाठी आवाहन केले आहे. यासंदर्भात पॅट कमिन्सने ट्वीटदेखील केले आहे. त्यात त्याने भारताप्रती त्याचे प्रेम देखील व्यक्त केले आहे.

हे ही वाचा:

कोलकाता नाइट रायडर्सचे ‘इशारों इशारों में’

सौदी अरेबियातील विद्यार्थी गिरवतायंत रामायण, महाभारताचे धडे

देवेंद्र फडणवीसांचे ज्युलिओ रिबेरोंना खुले पत्र

पप्पूगिरीचे सर्व हक्क काँग्रेसकडे राखीव

पण त्याचे हे दातृत्व भारतातील मोदी विरोधकांना मात्र सहन झालेले नाही. “कमिन्स तू करतो आहेस ते चांगले आहे पण पीएम केअर्स फंडला मदत देऊ नकोस.”, “पीएम केअर्सला दान देण्यापेक्षा दान न देणे केव्हाही उत्तम”, “पीएम केअर्सला मदतच का द्यावी?” अशी अनेक मुक्ताफळे या मंडळींनी उधळली आहेत. कोरोनासारख्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात एकत्र येऊन काम करायचे सोडून आपला राजकीय विरोध महत्वाचा वाटत असल्याचे या मंडळींनी दाखवून दिले.

दरम्यान पीएम केअर्सच्या माध्यमातून आजवर देशभर शेकडो कोटी रुपयांचा निधी हा कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी वापरण्यात आला आहे. ऑक्सिजन प्लॅण्ट्स उभारणी, व्हेंटीलेटर्स इत्यादी गोष्टींसाठी हा निधी वापरण्यात आला आहे.

Exit mobile version