पुण्यातील एल्गार परिषद पुन्हा एकदा वादग्रस्त ठरली आहे. ‘आजचा हिंदू समाज हा पूर्णपणे सडलेला आहे’ असे विष शर्जील उस्मानी यांनी ओकले आहे. शर्जील उस्मानी हा अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी असून त्याला नागरिकत्व कायद्याच्या विरोधात झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आली होती.
३० जानेवारी २०२१ रोजी पुण्यातील गणेश कला क्रीडा मंचाच्या सभागृहात एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. निवृत्त न्यायमुर्ती बी.जी.कोळसे-पाटील, अरुंधती रॉय, शर्जील उस्मानी अशा सर्व वादग्रस्त वक्त्यांची मांदीआळी या परिषदेच्या माध्यमातून एकत्र आली होती. या एल्गार परिषदेत हिंदू विरोधी विचारांची गरळ या वक्त्यांनी ओकली. या परिषदेसाठी कोळसे-पाटील यांच्या विरोधात मध्य प्रदेशात दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या असून आता शार्जीलच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वातावरण तापले आहे.
राज्यात हिंदू विरोधी सरकार असल्यामुळेच हे धाडस!
शर्जीलच्या वक्तव्या विरोधात समाजाच्या सर्व स्तरातून चीड व्यक्त होत आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते, आमदार अतुल भातखळकर यांनी उस्मानीच्या वक्तव्याचा समाचार घेताना राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “राज्यात हिंदू विरोधी सरकार असल्यामुळेच हे धाडस केले जात आहे.” असा घणाघात आमदार भातखळकर यांनी केला आहे.
आजचा हिंदू समाज हा सडलेला, हे कोण बोलतंय? शरजिल उस्मानी नावाचा भामटा. एल्गार परिषदेत ही गरळ ओकण्यात आली. राज्यात हिंदू विरोधी सरकार असल्यामुळे हे धाडस केले जाते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या विरोधात काही करण्याची अपेक्षाच नाही.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 31, 2021