भाजपाच्या आरोपांना उत्तरे द्या नवाब मलिक, भ्रमिष्टा सारखे बोलू नका

भाजपाच्या आरोपांना उत्तरे द्या नवाब मलिक, भ्रमिष्टा सारखे बोलू नका

राज्याच्या गृहमंत्र्यांवर १०० कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप झाल्यानंतर त्यांच्या बचावासाठी मंत्रीमंडळातील प्रत्येक नेता सरसावला आहे. राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी तर थेट रश्मी शुक्ला या भाजपाच्या एजंट असल्याचा आरोप केला होता. या आरोपावर भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा:

बेअब्रु सरकार, रया गेलेले पवार

‘या’ दिवसापासून पंचेचाळीसपेक्षा जास्त वय असलेल्या सर्वांना मिळणार लस

हायवे बांधणीचा वेग ‘द्रुतगती’वर

मंत्री नवाब मलिक यांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना थेट भाजपाचे एजंट म्हटले. त्यावर आमदार अतुल भातखळकर यांनी ‘नवाब मलिक हे अंमली पदार्थांच्या आरोपामुळे अटकेत असलेल्या त्यांच्या जावयाला भेटून आलेले दिसत आहेत आणि त्याचा त्यांच्यावरचा अंमल अजून गेलेला दिसत नाही’. अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. त्याबरोबरच ‘रश्मी शुक्ला यांनी केलेले फोन टॅपींग हे या सरकारच्या काळात केलेलं आहे. जर त्यांनी काही नियमबाह्य काम केल होतं तर त्यांच्यावर कारवाई का नाही केली?’ असा सवाल देखील त्यांनी यावेळी उठवला. ‘बेताल आणि भ्रष्ट होऊन बडबडणं हे नवाब मलिक आणि सचिन सावंत यांचं काम आहे. खरंतर जे आरोप देवेंद्र फडणवीसांनी केले आहेत, त्याचं उत्तर द्या.’ अशी मागणी देखील त्यांनी केली.

‘राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी डीजींनी भ्रष्टाचाराचा दिलेला अहवाल गृहमंत्र्यांकडे देणं म्हणजे चोराच्या हाती खजिन्याच्या चाव्या देण्यासारखं आहे’, असे देखील ते म्हणाले. त्यानंतर ‘घरात लपून बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या प्रश्नांची उत्तर द्यावीत. हा अहवाल त्यांच्याकडे आला की नाही हे देखील सांगावे आणि या अहवालावर काय कारवाई केली हे सांगावे’ अशी मागणी देखील त्यांनी केली.

Exit mobile version